शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

राज्यसभेच्या उपाध्यक्षपदी नरेश गुजराल?, सर्वसहमतीसाठी भाजपाचे प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2018 13:30 IST

नरेश गुजराल हे शिरोमणी अकाली दलाचे सदस्य आहेत.

नवी दिल्ली- राज्यसभेच्या उपाध्यक्षपदी सर्वांच्या सहमतीने नियुक्ती व्हावी यासाठी भारतीय जनता पार्टीने प्रयत्न सुरु केले आहेत. भारतीय जनता पार्टीचे राज्यसभेत सर्वाधीक सदस्य असले तरी बहुमत नसल्यामुळे सत्ताधारी पक्षाला इतर पक्षांवर अवलंबून राहावे लागणार आहे.  1 जुलै रोजी पी. जे. कुरियन यांचा उपाध्यक्षपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर नवा उपाध्यक्ष कोण याची चर्चा सुरु झाली आहे. उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी सत्ताधारी व विरोधकांना सर्व सहमतीने कुरियन यांच्या जागी योग्य व्यक्तीची नेमणूक करावी आसे आवाहन केले आहे.

या पदासाठी भारतीय जनता पार्टी अकाली दलाचे नरेश गुजराल यांचे नाव पुढे करेल अशी चर्चा आहे. त्यांना बिजू जनता दलाची साथ मिळेल असे सांगण्यात येते. यापुर्वी रालोआमध्ये नसलेल्या बिजू जनता दलाच्या खासदाराची या पदावर नियुक्ती व्हावी यासाठी भाजपाचे प्रयत्न होते.

कुरियन आणि इतर अनेक मंत्री व खासदारांशी आपल्या निवासस्थानी बोलताना व्यंकय्या नायडू यांनी उपाध्यक्षपदासाठी निवडणूक टाळण्याचे आवाहन केले. सरकार व विरोधी पक्षांनी सर्व सहमतीने निवड करावी असे त्यांनी सुचवले. असे असले तरी काँग्रेस याची चर्चा यूपीएचे सदस्य पक्ष व इतर विरोधीपक्षांशी करेल अशी शक्यता आहे. तृणमूल काँग्रेसने भावी उपाध्यक्ष हा काँग्रेसचा नसावा यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. 18 जुलै रोजी संसदेचे मॉन्सून अधिवेशन सुरु होणार आहे.

कोण आहेत नरेश गुजराल ? नरेश गुजराल हे माजी पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल यांचे पूत्र आहेत. त्यांचा जन्म 19 मे 1948 रोजी पंजाबातील जालंधर येथे झाला. शिरोमणी अकाली दलातर्फे ते राज्यसभेत निवडून गेले आहेत. त्यांचे शिक्षण नवी दिल्लीमधील सेंट स्टीफन्स महाविद्यालयात झाले. राज्यसभेतील एक अभ्यासू खासदार म्हणून त्यांची ओळख आहे. गुजराल संसदेतील विविध अभ्यासविषयगटांचे सदस्य आहेत.

टॅग्स :Rajya Sabhaराज्यसभाShiromani Akali Dalशिरोमणी अकाली दलVenkaiah Naiduव्यंकय्या नायडूElectionनिवडणूक