शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

भाजपा प्रवेशासाठी पाटीदार नेत्याला 1 कोटींची ऑफर : नरेंद्र पटेल यांनी पुरावा म्हणून जारी केली ऑडिओ क्लिप

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2017 11:55 IST

गुजरातमधील पाटीदार आंदोलनातील नेते नरेंद्र पटेल यांनी भाजपा प्रवेशासाठी 1 कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली होती, असा खळबळजनक आरोप 22 ऑक्टोबरला केला होता. या पार्श्वभूमीवर पुरावा म्हणून नरेंद्र पाटील यांनी एक ऑडिओ क्लिपदेखील जारी केली आहे.

अहमदाबाद - गुजरातमधील पाटीदार आंदोलनातील नेते नरेंद्र पटेल यांनी भाजपा प्रवेशासाठी 1 कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली होती, असा खळबळजनक आरोप  22 ऑक्टोबरला केला होता. या पार्श्वभूमीवर पुरावा म्हणून नरेंद्र पटेल यांनी एक ऑडिओ क्लिपदेखील जारी केली आहे. या क्लिपमध्ये भाजपा प्रवेशासाठीच्या 1 कोटी रुपयांच्या ऑफरसंदर्भात बोलणी सुरू असल्याचा दावा त्यांनी केला आहे. 'एनडी टीव्ही'नं यासंदर्भातील वृत्त दिले आहे. मात्र या ऑडिओ क्लिपची विश्वासार्हतेला अद्यापपर्यंत अधिकृत स्वरुपात दुजोरा मिळालेला नाही, असेही एनडी टीव्हीनं स्पष्ट केले आहे. 

काय आहे नेमकी घटना ?विधानसभेची निवडणूक जवळ येऊ लागली असतानाच गुजरातेत घोडाबाजार आणि नेत्यांना आपल्या पक्षात आणण्यासाठी प्रलोभने देण्याचे प्रकार समोर येऊ लागले आहेत. मात्र याचा भाजपाला चांगलाच फटका बसत आहे. आपल्याला भाजपात येण्यासाठी एक कोटीची ऑफर दिल्याचा आरोप पटेल समाजाचे नेते नरेंद्र पटेल यांनी केला. पत्रकार परिषद घेत त्यांनी हा आरोप केला होता. नरेंद्र पटेल यांनी मला भाजपामध्ये प्रवेशासाठी १ कोटी रुपयांची आॅफर दिली होती आणि त्यापैकी १0 लाख रुपये रोख दिले होते, असे सांगताना ती रक्कमच पत्रकार परिषदेत सादर केली होती. उरलेले ९0 लाख सोमवारी देण्याचे मान्य करण्यात आले होते, असा आरोपही नरेंद्र पटेल यांनी केला होते. यावरून भाजपाचा चांगलाच समाचार घेतला जात आहे. राहुल गांधी यांनीही गांधीनगरच्या सभेत ‘गुजरातचा आवाज’ विकत घेतला जाऊ शकत नसल्याचा टोला भाजपाला लगावला होता.

निखिल सवानी यांचीही भाजपाला सोडचिठ्ठीदरम्यान, 23 ऑक्टोबरला निखिल सवानी या पटेल समाजाच्या नेत्याने भाजपा सोडणार असल्याचे जाहीर करून भाजपाला झटका जोरदार झटका दिला होता. आणखी दोन नेतेही काँग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. सवानी यांनी आपण भाजपामधून बाहेर पडत असल्याचे जाहीर केले. दरम्यान, नरेंद्र पटेल व सवानी हे दोघे हार्दिक पटेल यांचे समर्थक आहेत. काही दिवसांपूर्वीच सवानी भाजपामध्ये गेले होते. आपण नरेंद्र पटेल यांचे अभिनंदन करतो, असे सांगून सवानी म्हणाले की, एका गरीब कुटुंबातून आले असतानाही पटेल यांनी भाजपाची एक कोटीची ऑफर नाकारली, ही बाब अतिशय महत्त्वाची आहे. आपणास भाजपाने कोणतीही पैशांची ऑफर दिली नव्हती, हे स्पष्ट करतानाच ते म्हणाले की, आपणास केवळ आश्वासनांचा लॉलिपॉप भाजपाने दाखवला. मात्र पटेल समाजाच्या नेत्यांना फोडण्यासाठी भाजपाकडून पैशांची ऑफर दिली जात असल्याचे आपण ऐकून आहोत, असे यावेळी त्यांनी म्हटले होते.

टॅग्स :Gujarat Election 2017गुजरात निवडणूक 2017Gujaratगुजरात