शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

नरेंद्र मोदींच्या पाकिस्तानी बहिणीने पाठवली राखी, तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्यासाठी दिल्या शुभेच्छा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2022 20:42 IST

रक्षाबंधनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी सीमेपलीकडून खास भेट आली आहे.

नवी दिल्ली: देशभरात सध्या रक्षाबंधनाची जोरदार तयारी सुरू आहे. देशभरातील बाजारपेठा राख्यांनी आणि विविध भेटवस्तूंनी सजल्या आहेत. रक्षाबंधनाला बहिणी आपल्या भावाच्या हातावर राखी बांधतात, तर ज्या बहिणी भावापासून दूर राहतात, त्या पोस्टाने त्यांना राखी पाठवतात. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाकिस्तानी बहिणीने असेच काहीसे केले आहे. 

रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी नरेंद्र मोदींना राखी पाठवली आहे. यासोबतच त्यांनी नरेंद्र मोदींना आगामी निवडणुकांसाठी शुभेच्छाही दिल्या. एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना पीएम मोदींची पाकिस्तानी बहीण कमर मोहसिन शेख यांनी सांगितले की, त्यांनी राखीसोबत नरेंद्र मोदी यांना एक पत्रही पाठवले आहे. या पत्रामध्ये त्यांनी नरेंद्र मोदींना तिसर्‍यांदा पंतप्रधानपदी निवड होण्याच्या आणि निरोगी आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

स्वतःच्या हाताने बनवली राखीपंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पाकिस्तानी बहीण कमर मोहसीन शेख यांनी मोदींसाठी पाठवलेली राखी स्वतः तयार केली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना कमर मोहसीन शेख यांनी सांगितले की, त्यांनी सिल्क रिबनमध्ये ही राकी तयार केली आहे. कमर मोहसीन शेख यांना यावेळी नरेंद्र मोदी यांना भेटण्याची इच्छा आहे. तसेच त्यांनी नरेंद्र मोदी आपल्याला दिल्लीला बोलावतील अशी आशा व्यक्त केली.

नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार कमर मोहसीन शेख यांनी सांगितले की, त्यांनी राखीसोबत एक पत्र देखील पाठवले आहे. पत्रामध्ये त्यांनी पंतप्रधानांच्या दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य आणि तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार यात शंका नाही, असेही त्या म्हणाल्या. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीPakistanपाकिस्तानRaksha Bandhanरक्षाबंधन