शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

चाचेगिरी आणि दहशतवादासाठी समुद्री मार्गांचा दुरुपयोग, नरेंद्र मोदींनी UNSC मध्ये मांडली 5 तत्वे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2021 19:09 IST

Nnarendra Modi in UNSC: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'समुद्री सुरक्षेला चालना: आंतरराष्ट्रीय सहकार्याची गरज' विषयावर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या हायलेव्हल ओपन डिबेटमध्ये भाष्य केलं.

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत (UNSC) सागरी सुरक्षेवरील खुल्या चर्चेच्या अध्यक्षस्थानी आहेत. ही बैठक व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे होत असून, यात संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या सदस्य देशांचे पंतप्रधान किंवा राष्ट्रपती, यूनाइटेड नेशंस सिस्टम उच्च आण आणि प्रमुख प्रादेशिक संघटनाचे प्रमुख उपस्थित आहेत. हा कार्यक्रम UNSC च्या वेबसाईटवर लाइव्ह स्वरुपात सुरू आहे.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'समुद्री सुरक्षेला चालना: आंतरराष्ट्रीय सहकार्याची गरज' विषयावर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदे (UNSC) च्या हायलेव्हल ओपन डिबेटमध्ये भाष्य केलंय. यावेळी ते म्हणाले की, 'समुद्र हा आपला वारसा आहे. समुद्री मार्ग आंतरराष्ट्रीय व्यापाराची लाइफ लाइन आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे, समुद्र आपल्या पृथ्वीसाठी सर्वात महत्वाचा आहे. पण, आज आपल्या या समुद्राला अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे.'

चाचेगिरी आणि दहशतवादासाठी दुरुपयोगमोदी पुढे म्हणाले की, 'आज चाचेगिरी आणि दहशतवादासाठी समुद्री मार्गांचा दुरुपयोग होत आहे. अनेक देशांमध्ये समुद्री सीमेवरुन वाद सुरू आहे, तर हवामान बदलामुळेही या समुद्रावर मोठा परिणाम पडत आहे. मी तुमच्यासमोर पाच मूलभूत तत्त्वे मांडू इच्छितो.

1: आपण वैध सागरी व्यापारामधील अडथळे दूर केले पाहिजेत. आपल्या सर्वांची समृद्धी सागरी व्यापाराच्या सक्रिय प्रवाहावर अवलंबून आहे. यामधील अडथळे संपूर्ण जागतिक अर्थव्यवस्थेसाठी आव्हान ठरू शकतात. 

2: सागरी वाद शांततेने आणि आंतरराष्ट्रीय कायद्याच्या आधारावर सोडवायला हवे. परस्पर विश्वास आणि धैर्यासाठी हे आवश्यक आहे. जागतिक शांतता आणि स्थिरता सुनिश्चित करण्याचा हा एकमेव मार्ग आहे.

3: आपण नैसर्गिक आपत्ती आणि समुद्री धोक्यांना सामोरे जायला हवं. भारताने या विषयावर प्रादेशिक सहकार्य वाढवण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत. आम्ही अनेकदा चक्रीवादळ, त्सुनामी आणि प्रदूषणाशी संबंधित सागरी आपत्तींचा सामना केला आहे.

4: सागरी पर्यावरण आणि सागरी संसाधने जपायची आहेत. आपल्याला माहीत आहे की, महासागराचा वातावरणावर थेट परिणाम होतो आणि म्हणूनच आपल्याला आपले सागरी पर्यावरण प्लास्टिक आणि तेल गळतीसारख्या प्रदूषणापासून मुक्त ठेवायचे आहे. 

5: आपण जबाबदार सागरी कनेक्टिव्हिटीला प्रोत्साहन दिले पाहिजे. सागरी व्यापार वाढवण्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण करणे आवश्यक आहे, परंतु अशा पायाभूत प्रकल्पांच्या विकासासाठी देशांची वित्तीय स्थिरता आणि शोषण क्षमता विचारात घ्यावी लागेल. 

भारताला मिळाले UNSC चे अध्यक्षपदUNSC यूनायटेड नेशंसच्या 6 प्रमुख अंगांपैकी एक आहे. यावर जगभर शांती आणि सुरक्षा कायम ठेवण्याची जबाबदारी आहे. भारताला स्वातंत्र्याच्या 75व्या वर्षी जगातील या सर्वात शक्तीशाली संस्थेचे अध्यक्षपद मिळाले आहे. 75 वर्षात पहिल्यांदाच भारतीय पंतप्रधान UNSC च्या अध्यक्षपदी विराजमान आहेत.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीunited nationsसंयुक्त राष्ट्र संघ