शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
2
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
3
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
4
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
5
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
6
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
7
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
8
निधीटंचाई; शेततळ्यांना सरकारनेच दिली कबुली; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती : रक्कम देताना हात आखडता
9
५० एकरहून जास्त भूखंडांवर क्लस्टर रिडेव्हलपमेंट प्रकल्प; उपमुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
10
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
11
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
12
झोपडपट्ट्यांत मूल विकणाऱ्या टोळ्या सक्रिय; हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी 'ऑपरेशन मुस्कान'
13
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
14
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
15
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
16
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
17
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
18
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
19
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
20
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
Daily Top 2Weekly Top 5

मोदीजी 'मन की बात' मध्ये नीरव मोदी आणि राफेल डीलविषयी बोला- राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2018 15:55 IST

नीरव मोदीने २२ हजार कोटी रुपये कसे लुटले व त्याने पलायन कसे केले?

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात'च्या आगामी भागात नीरव मोदी आणि राफेल व्यवहाराविषयी बोलावे, अशी मागणी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे. त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर म्हटले की,  मोदीजी गेल्या महिन्यात 'मन की बात'साठी मी सुचविलेल्या विषयाकडे तुम्ही दुर्लक्ष केले होते. मात्र, गेल्या काही दिवसांतील घडामोडींनंतर देशातील प्रत्येक नागरिकाला तुमच्याकडून काय ऐकायचे आहे, हे तुम्हाला उमगलेच असेल. तेव्हा 'मन की बात'साठी इतरांकडून सूचना मागवण्याची गरजच काय, असा सवाल राहुल यांनी विचारला. नीरव मोदीने २२ हजार कोटी रुपये कसे लुटले व त्याने पलायन कसे केले? ५८ हजार कोटी रुपयांचा राफेल विमान खरेदी व्यवहार या दोन मुद्द्यांवर तुम्ही बोललेच पाहिजे. मी तुमचे प्रवचन ऐकण्यासाठी उत्सुक आहे, असे राहुल यांनी म्हटले आहे. गेल्या काही दिवसांपासून राहुल गांधी पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यावरून पंतप्रधान मोदींना सातत्याने लक्ष्य करत आहेत. यापूर्वी राहुल यांनी जानेवारीमध्ये मोदी यांना ‘मन की बात’साठी राहुल यांनी बेरोजगारी, चीनची घुसखोरी व हरियाणातील बलात्कार हे विषय सुचवले होते. तसेच मोदींकडे विद्यार्थ्यांसाठी दोन तास आहेत, परंतु बँक घोटाळ्यावर बोलण्यासाठी दोन मिनिटेही नाहीत. असे वागणे बंद करा, अशी सूचना राहुल यांनी केली होती.

राहुल गांधी २४ फेब्रुवारी कर्नाटक दौऱ्यावर जाणार आहेत. कर्नाटकमधील विधानसभा निवडणुकीच्यादृष्टीने त्यांनी तीनदिवसीय दौरा आखला आहे. बेळगाव, विजापूर, बागलकोट, धारवाडमध्ये जाणार आहेत. त्यासाठी जनआशीर्वाद यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. राहुल बसने प्रवास करण्याची शक्यता आहे. त्याशिवाय राहुल गांधी मंदिर, दर्ग्यावरही जातील.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधीMan ki Baatमन की बात