शहरं
Join us  
Trending Stories
1
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
2
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
3
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
4
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
5
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
6
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
8
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
9
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
10
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
11
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
12
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
13
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
14
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
15
‘जन्माधारित नागरिकत्व’चा ट्रम्प यांचा निर्णय कोर्टाकडून स्थगित; अमेरिकेतील भारतीयांना दिलासा
16
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष
17
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
18
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
19
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
20
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!

आव्हानांना आव्हान देण्यासाठी निघालो आहे! CAA, अयोध्या, 370 यावरून मोदींचे सूचक विधान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2019 18:18 IST

सीएए (CAA) कायद्याविरोधात आंदोलन करताना हिंसाचार आणि सरकारी मालमत्तेचे नुकसान करणाऱ्यांनाही मोदींनी मोलाचा सल्ला दिला

लखनऊ - केेंद्र सरकारने नुकत्याच मंजूर करून घेतलेल्या नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून (CAA) सध्या देशात मोठा वाद निर्माण झालेला आहे. मात्र असे असले तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या नेतृत्वाखालील सरकार यापुढेही असेच मोठे आणि कठोर निर्णय घेईल, असे स्पष्ट केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय विद्यापीठाच्या भूमीपूजनासाठी लखनऊ येथे आले होते. त्यावेळी त्यांनी हे विधान केले. कार्यक्रमादरम्यान उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीएए, राम मंदिर आणि कलम 370 यांचा उल्लेख करत काही समस्या आम्हाला वारशामध्ये मिळाल्याचे सांगितले. मात्र आम्ही आव्हानांना आव्हान देण्याच्या इराद्याने निघालो आहोत, असे सूचक विधान मोदींनी केले. राम मंदिराचा प्रश्न शांततापूर्ण मार्गाने निकाली निघाला आहे. फाळणी झाल्यापासून आतापर्यंत पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशमधील लाखो गरीब ज्यांच्यामध्ये दलित, वंचित शोषितांची संख्या अधिक आहे असे लोक आपल्या मुलीची अब्रू वाचवण्यासाठी भारतात आश्रयाला आले आहेत. अशा आश्रितांना नागरिकत्व देण्याचा तोडगा 130 कोली भारतीयांना काढला आहे. 

यावेळी सीएए कायद्याविरोधात आंदोलन करताना हिंसाचार आणि सरकारी मालमत्तेचे नुकसान करणाऱ्यांनाही मोदींनी मोलाचा सल्ला दिला आणि त्यांच्या अधिकारांसोबत कर्तव्यांचीही आठवण करून दिली. ''उत्तर प्रदेशमध्ये काही लोकांना सीएएला विरोध म्हणून आंदोलन करताना हिंसाचार केला. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केले. असे नुकसान करणाऱ्या व्यक्तींनी आपल्या घरात बसून आपण निवडलेला मार्ग योग्य होता का? आपली कृती योग्य होती का हे स्वत:लाच विचारून पाहावे. जी जाळपोळ करण्यात आली, ज्या सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करण्यात आले. ते त्यांच्या मुलांच्या उपयोगी आले नसते का?''असा सवाल मोदींनी केला.

अटल बिहारी वाजपेयींच्या जयंतीदिनी पंतप्रधान मोदींच्या हस्ते 'अटल भूजल' योजनेचं उद्घाटनदरम्यान, माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या 95व्या जयंतीनिमित्त केंद्र सरकारने अटल भूजल योजना सुरु केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अटल भूजल या नवीन योजनेचं उद्घाटन केलं आहे. अटल भूजल योजनेच्या माध्यमातून प्रत्येक घरात पाणी पोहोचवण्यात येईल. तसेच ज्या भागांतील पाणीपातळीत मोठी घट झाली आहे किंवा वेगाने घट होत आहे, अशा भागांत विशेष लक्ष दिले जाणार असल्याचे नरेंद्र मोदी यांनी सांगितले. त्याचप्रमाणे हिमाचल प्रदेशमधील रोहतांग पास येथे तयार करण्यात आलेल्या बोगदा 'अटल टनल' नावाने ओळखले जाणार असल्याचे देखील नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितले. अटल भूजल योजनेवर पाच वर्षामध्ये (2020-21 ते 2024-25) सहा हजार कोटींचा खर्च करण्यात येणार आहे. या योजनेचा फायदा महाराष्ट्रासह हरयाणा, कर्नाटक, गुजरात, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश आणि राजस्थान या राज्यांना होईल. ही सात राज्ये वाटत असली तरी या देशाचा ५० टक्के भाग आहेत. तसेच या सात राज्यांतील ७८ जिल्ह्यांमधील ८३०० गावांमधील पाणीपातळीची स्थिती खूपच गंभीर असल्याचे देखील नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीCentral Governmentकेंद्र सरकारcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकUttar Pradeshउत्तर प्रदेश