शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

PM Security: पंतप्रधानांची सुरक्षा राष्ट्रपतींच्या दरबारात; केंद्राकडून कठोर निर्णयाचे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2022 07:14 IST

पंजाब येथे हुसैनीवाला भागात शहीद स्मारकाला भेट देण्यासाठी जाणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाहनांचा ताफा शेतकरी आंदोलकांनी एका फ्लायओव्हरवर रोखला. तिथे मोदी यांना १५ ते २० मिनिटे अडकून पडावे लागले.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : पंजाबमधील सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटींमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या राज्याचा दौरा अर्धवट सोडून दिल्लीला परतावे लागले होते. त्याची सविस्तर माहिती नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना गुरुवारी भेट घेऊन दिली. सुरक्षेतील हलगर्जीपणाबद्दल राष्ट्रपतींनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. पंजाबमधील घटनेची केंद्रीय गृहखाते माहिती गोळा करीत आहे. या राज्यात घडलेल्या प्रकारानंतर केंद्र सरकार अतिशय मोठे व कठोर निर्णय घेणार असल्याचे संकेत केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर यांनी दिले.

पंजाब येथे हुसैनीवाला भागात शहीद स्मारकाला भेट देण्यासाठी जाणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाहनांचा ताफा शेतकरी आंदोलकांनी एका फ्लायओव्हरवर रोखला. तिथे मोदी यांना १५ ते २० मिनिटे अडकून पडावे लागले. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेत हलगर्जीपणा होणे, हा अतिशय गंभीर प्रकार आहे. 

राष्ट्रपती सचिवालयाने म्हटले आहे की, पंजाबमध्ये सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटींची माहिती मोदी यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना दिली. मोदींच्या दौऱ्यात सुरक्षेबाबत निर्माण झालेल्या गंभीर प्रश्नाबद्दल कोविंद यांनी तीव्र चिंता व्यक्त केली. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी सांगितले की, पंजाबमध्ये सुरक्षाविषयक जो प्रश्न निर्माण झाला, त्याची भविष्यात पुनरावृत्ती होऊ न देण्याची दक्षता घेतली यावी.पंजाबमधील घटनेबद्दल मंत्रिमंडळ बैठकीत संताप व्यक्तपंजाबमध्ये पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटींवर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत सविस्तर चर्चा झाल्याचे समजते. याबाबत केंद्रीय मंत्र्यांनी तीव्र चिंता व संताप व्यक्त केला. या घटनेस जबाबदार असलेल्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणीही केंद्रीय मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीत केली. सुरक्षा त्रुटीला पंजाब सरकारच जबाबदार : राजनाथसिंह

पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यात असलेल्या सुरक्षा त्रुटींना तेथील राज्य सरकारच जबाबदार आहे. या चुकीबद्दल काँग्रेसला कधीही माफ करता येणार नाही, असे केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी म्हटले आहे. पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेवरून सुरू असलेला वाद दुर्दैवी आहे. त्या पदावरील व्यक्तीच्या सुरक्षेबाबत सर्वांनी नेहमीच दक्ष राहिले पाहिजे, असे माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी म्हटले आहे.शेतकऱ्यांनी वर्षभर त्रास सहन केला : सिद्धू

रस्ता रोखला गेल्यामुळे मोदी यांना १५ मिनिटे त्रास सहन करावा लागला, पण अन्यायकारक नव्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना वर्षभर यातना भोगाव्या लागल्या आहेत अशी टीका पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांनी केली आहे.

सर्वोच्च न्यायालयात याचिकेवर आज सुनावणीn पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौऱ्यामध्ये सुरक्षाविषयक त्रुटी आढळून आल्या, तसा प्रकार भविष्यात पुन्हा घडता कामा नये याकरिता सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली. n ही याचिका आज, शुक्रवारी सुनावणीस घेण्याचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने मान्य केले आहे. सुरक्षेतील त्रुटींचा मुद्दा ज्येष्ठ विधिज्ञ मणिंदरसिंग यांनी सर्वोच्च न्यायालयात उपस्थित केला होता.

सरकार पाडण्याचा डावपंजाबमध्ये पंतप्रधानांच्या जीवाला धोका होता असा खोटा प्रचार सुरू आहे. या राज्यात लोकशाही मार्गाने निवडून आलेले सरकार उलथविण्याचा हा डाव आहे. पंतप्रधान हे देशाचे आदरणीय नेते असतात. पण ती आब न राखता मोदी सवंग पद्धतीने पंजाबमधील घटनेचा अर्थ लावत आहेत.    - चरणजितसिंग चन्नी, मुख्यमंत्री, पंजाब 

केंद्राची चौकशी समिती  पंतप्रधानांच्या सुरक्षेतील गंभीर त्रुटींची चौकशी करण्यासाठी केंद्रीय गृह खात्याने एक समिती स्थापन केली आहे. सुरक्षा विभागाचे सचिव सुधीर सक्सेना, आयबीचे संचालक बलबीरसिंह, एसपीजीचे आयजी एस. सुरेश यांचा समावेश आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी