शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

नरेंद्र मोदी आज घेणार तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ; राज्यातून १२ जणांची मंत्रिपदासाठी चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2024 07:27 IST

Narendra Modi Oath Ceremony : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील एनडीए सरकारचा रविवारी सायंकाळी ७:१५ वाजता शपथविधी होत आहे. राष्ट्रपती भवन येथे हा सोहळा होणार असून, मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होत आहेत. 

- संजय शर्मानवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील एनडीए सरकारचा रविवारी सायंकाळी ७:१५ वाजता शपथविधी होत आहे. राष्ट्रपती भवन येथे हा सोहळा होणार असून, मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होत आहेत. 

नव्या मंत्र्यांना रविवारी सकाळी पंतप्रधान कार्यालयातून फोन जाणार आहे. त्यांना पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा हे आपल्या निवासस्थानी बोलविणार असून, तेथे त्यांच्याशी चर्चा करणार आहेत. ‘मोदी सरकार ३.०’ च्या शपथविधी सोहळ्यासाठी पूर्ण तयारी झाली आहे. नियमानुसार केंद्रीय मंत्रिमंडळात ७८ मंत्री असतात; परंतु सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जवळपास ४० ते ४५ मंत्री रविवारी शपथ घेतील. त्यासाठी एनडीएच्या घटकपक्षांनी शुक्रवारीच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याकडे मंत्र्यांची नावे सादर केली. ही नावे अंतिम करण्याबाबत केंद्रीय पातळीवर बैठकांचे सत्र सुरू आहे. 

लोकसभाध्यक्ष, भाजपाध्यक्ष पदांसाठी या नावांची चर्चाभाजपने लोकसभा अध्यक्षपदासाठी विविध नावांवर चर्चा सुरू केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पसंतीने एका नेत्याची त्यासाठी निवड केली जाईल. मनोहरलाल खट्टर यांच्यापासून ते शिवराजसिंह चौहान यांच्यापर्यंत काही नावांची चर्चा आहे. भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांना केंद्रात मंत्रिपद दिले जाण्याची शक्यता आहे. नड्डा यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. त्यांचा कार्यकाळ लोकसभा निवडणुकीपर्यंत वाढवण्यात आला होता. भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी शिवराजसिंह चौहान, सी. आर. पाटील यांच्या नावांची चर्चा आहे. राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी आरएसएसची पसंतही विचारात घेतली जाईल.

रक्षा खडसे, पंकजा मुंडे यांना संधी? डॉ. भारती पवार यांच्या पराभवामुळे मंत्रिमंडळात महिला चेहरा देण्याचाही भाजपश्रेष्ठींवर दबाव असून, लोकसभेवर सलग तिसऱ्यांदा निवडून आलेल्या रक्षा खडसे, बीडमध्ये पराभूत पंकजा मुंडे यांच्या नावाचीही चर्चा आहे. 

संभाव्य मंत्र्यांमध्ये देशातून आणखी कोण-कोण?  अमित शाह, जे. पी. नड्डा, राजनाथ सिंह, एस. जयशंकर, अश्विनी वैष्णव, ललन सिंह, रामनाथ ठाकूर, चिराग पासवान, जीतन मांझी, अनुप्रिया पटेल, जयंत चौधरी, प्रल्हाद जोशी, गिरिराज सिंह, नित्यानंद राय , ज्योतिरादित्य सिंधिया, मनसुख मंडविया, अनुराग ठाकूर, किरन रिजीजू, डॉ. जितेंद्र सिंह, सुरेश गोपीनाथ, शिवराजसिंह चौहान, फग्गनसिंह कुलस्ते, शोभा करंदलाजे, किशन रेड्डी, बंडी संजय, गजेंद्रसिंह शेखावत, अर्जुन मेघवाल

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाCentral Governmentकेंद्र सरकार