शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

पहलगाम हल्ल्यात मृत्यू झालेल्या शुभम द्विवेदीच्या कुटुंबीयांची मोदींनी घेतली भेट, दिलं 'हे' आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 16:23 IST

Narendra Modi And Shubham Dwivedi : नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी कानपूर भेटीदरम्यान पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या शुभम द्विवेदी याच्या कुटुंबीयांची भेट घेतली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी कानपूर भेटीदरम्यान पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या शुभम द्विवेदी याच्या कुटुंबीयांची भेट घेतली. पंतप्रधान मोदींना भेटल्यानंतर शुभम द्विवेदीची पत्नी ऐशन्या द्विवेदीने प्रतिक्रिया दिली. पंतप्रधानांनी दहशतवादाविरुद्धची लढाई अजून संपलेली नाही असं सांगितल्याचं ऐशन्याने म्हटलं आहे. 

"पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, संपूर्ण देश आणि सरकार आमच्यासोबत आहे. पंतप्रधान खूप दुःखी होते, त्यांनी मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल विचारलं. दहशतवादाविरुद्धची लढाई अजून संपलेली नाही असं मोदींनी सांगितलं. तसेच त्यांनी आम्हाला आणखी एका भेटीचं आश्वासन दिलं" असं ऐशन्या द्विवेदीने सांगितलं आहे.  

मोदींना भेटल्यानंतर शुभम द्विवेदीचे वडील संजय द्विवेदी म्हणाले की, "पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून दहशतवादाविरुद्ध कारवाई सुरू करण्यात आल्याबद्दल आम्ही आभार मानतो. पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले. दहशतवादाविरुद्धच्या लढाईत संपूर्ण देश पंतप्रधानांसोबत आहे. पंतप्रधान मोदींनी आम्हाला सांगितलं की दहशतवादाविरुद्धची लढाई सुरूच राहील. पंतप्रधान मोदीही भावूक झाले."

कानपूरचे खासदार रमेश अवस्थी यांनी एका आठवड्यापूर्वी पंतप्रधान कार्यालयाला पत्र लिहून नरेंद्र मोदी यांना पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या शुभम द्विवेदीच्या कुटुंबाला भेटण्याची विनंती केली होती. त्यानंतर मोदींनी शुभमच्या कुटुंबीयांची भेट घेतली आहे.  त्यांच्याशी संवाद साधला. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाTerrorismदहशतवादOperation Sindoorऑपरेशन सिंदूर