शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

Narendra Modi Loksabha Speech: तुम्ही एक क्षणही मोदींशिवाय घालवू शकत नाही; पंतप्रधानांनी घेतली काँग्रेसची फिरकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2022 18:55 IST

इतक्या वर्षांपर्यंत निवडणुकीत पराभव झाल्यानंतरही अहंकारात बदल झाला नाही, मोदींचा काँग्रेसवर निशाणा.

लोकसभेत आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनीकाँग्रेसच्या पराभवांचे वाभाडे काढले आहेत. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर झालेल्या चर्चेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर देत होते. यावेळी त्यांनी संसदर सदस्यांचे राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आपले विचार मांडल्याबाबत आभारही व्यक्त केले. दरम्यान, काँग्रेस एक क्षणही मोदींशिवाय राहू शकत नाही, असं म्हणत त्यांनी जोरदार टोला लगावला."तुम्ही फाईल्समध्ये अडकून राहिलात, पण आम्ही लोकांचं जीवन बनवलं. सध्या देशात पायाभूत सुविधांची कामंही वेगानं सुरू आहेत. यामुळे देशात रोजगार निर्माण होत आहे. तुम्ही एक क्षणही मोदींशिवाय घालवू शकत नाही. जे इतिहासातून काही बोध घेत नाहीत, ते इतिहासातच हरवून जातात," असं म्हणत मोदींनी काँग्रेसवर निशाणा शाधला.

अंहकार बदलला नाही"इतक्या वर्षांपर्यंत निवडणुकीत पराभव झाल्यानंतरही अहंकारात बदल झाला नाही. इतकी वर्षे देशावर राज्य करणारे आणि मोठ्या महालात राहणारे छोट्या शेतकऱ्यांबाबत बोलणं विसरुन गेले. भारताच्या प्रगतीसाठी छोट्या शेतकऱ्यांना सक्षम करणं आवश्यक आहे. छोटा शेतकरीही भारताची प्रगती अजून मजबूत करेल," असं मोदी यावेळी म्हणाले.  यावेळी त्यांनी कोणाचंही नाव न घेता 'मेक इन इंडिया'चा विरोध करणाऱ्यांवर निशाणा साधला. मेक इन इंडियाची खिल्ली उडवली गेली. परंतु याची खिल्ली उडवणाऱ्यांचीच लोकांनी मजा केली. जर तुमचे पाय जमिनीवर असते तर तुम्हाला गरीबांच्या समस्या दिसल्या असत्या. परंतु महात्मा गांधींचं स्वप्न पूर्ण होताना तुम्हाला पाहायचं नाही. तुम्ही योगाची खिल्ली उडवली आणि विरोध केला, असं म्हणत त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीlok sabhaलोकसभाcongressकाँग्रेस