शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: इटली दौऱ्यावर गेलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी माही गुरुजींशी मराठीत बोलतात तेव्हा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2021 20:00 IST

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या इटली दौऱ्यावर आहेत. रोममध्ये दाखल होताच मोदींचे भारतीयांकडून मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले.

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी चार दिवसांच्या परदेश दौऱ्यावर इटलीत दाखल झाले आहेत. शुक्रवारी त्यांनी राजधानी रोममधील महात्मा गांधींच्या पुतळ्याला पुष्प अर्पण केले. यानंतर मोदींचे भारतीय समुदायाने मोठ्या जल्लोषात स्वागत केले. यावेळी काही महिलांनी संस्कृतमधून श्लोक म्हटले. विशेष म्हणजे, यावेळी नरेंद्र मोदींनीइटलीत वास्तव्यास असलेल्या नागपूरच्या माही गुरुजींशी चक्क मराठीत आणि त्यानंतर एका महिलेने मोदींना 'केम छो...' म्हटल्यावर तिच्याशी गुजरातीमध्ये संवाद साधला.

कोण आहेत माही गुरुजी ?माही गुरुजी उर्फ महिंद्र सिरसाठ हे मूळचे नागपूरचे रहिवासी आहेत. त्यांचे वडील साहेबराव सिरसाठ हे नागपूर पोलिस दलात एएसआय पदावरून सेवानिवृत्त झाले. त्यांचे कुटुंब सीताबर्डी येथील क्वार्टरमध्ये राहत होते. 25 वर्षांपूर्वी काही कामानिमित्त ते इटलीला गेले होते. त्यावेळी या देशातही भारतीय संस्कृती व आयुर्वेद उपचार पद्धतीचा प्रचार करावा, असा साक्षात्कार त्यांना झाला. तेव्हापासून त्यांनी भारत सोडून इटलीला आपले कार्य सुरू केले. मागील 25 वर्षांपासून इटलीच नाही तर युरोपीय देशांमध्ये आयुर्वेदिक उपचार पद्धतीसह योग आणि अध्यात्माचा प्रचार, प्रसार करत आहेत. 

कोरोना पीडितांसाठी योगकोरोनाच्या सुरुवातीच्या काळात इटली देश सर्वाधिक प्रभावित झाला होता. मात्र, त्यावेळी माही गुरुजी यांच्या केंद्रातील साधक या जीवघेण्या आजारापासून सुखरूप होते. योग आणि आयुर्वेदामुळे कोरानापासून सुरक्षित राहत असल्याचा संदेश त्यांनी दिला व या काळात इटलीतील नागरिकांची योग प्रशिक्षणाद्वारे सेवा केली होती.

इटलीमध्ये G20 शिखर परिषद

पंतप्रधान नरेंद्र मोदी इटलीत जी-2- परिषदेसाठी गेले आहेत. जी-20 ची बैठक गेल्या वर्षी म्हणजेच 2020 मध्ये होणार होती, पण कोरोनामुळे ती पुढे ढकलावी लागली. आता ही परिषद रोममध्ये होत आहे. G20 ला 'वर्ल्ड इकॉनॉमिक इंजिन' असेही म्हणतात. या गटाची ही आठवी बैठक असेल. पंतप्रधान 31 ऑक्टोबरच्या दुपारपर्यंत रोममध्ये असतील. त्यानंतर ग्लासगोला रवाना होतील.

इटलीवरुन ब्रिटनला जाणारपंतप्रधान मोदी 31 ऑक्टोबरला इटलीहून ब्रिटनला रवाना होणार आहेत. येथे ते ग्लासगो, स्कॉटलंड येथे होणाऱ्या COP26 क्लायमेट चेंज समिटमध्ये भाग घेतील. हवामान बदलावरील ही 26वी शिखर परिषद आहे. ही इटली आणि ब्रिटन यांनी संयुक्तपणे आयोजित केली आहे. या परिषदेत 120 देशांचे प्रमुख सहभागी होणार आहेत. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीItalyइटलीnagpurनागपूर