शहरं
Join us  
Trending Stories
1
बळीराजाची खरी दिवाळी...! जीएसटी कपातीचा शेतकऱ्यांना काय-काय फायदा होणार? एकदा पहाच... 
2
वाट माझी बघतोय रिक्षावाला संघटना खूश होणार; कार, दुचाकींवर लागणार एवढा जीएसटी...
3
GST: मोठी घोषणा! २२ सप्टेंबरपासून नवीन जीएसटी दर लागू होणार; काय स्वस्त काय महागले...
4
GST Rate Cuts News: आरोग्य विमा, जीवन विम्यासह ३३ औषधांवर शून्य GST; विद्यार्थ्यांना काय...? 
5
दिल्ली पोलीस पुण्यात आले, बेड्या ठोकून घेऊन गेले; बलात्कार प्रकरणी अभिनेता आशिष कपूरला अटक
6
कामगारांनो, आता ९ तासांऐवजी १२ तास काम, मात्र...; राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
7
दादर टर्मिनसबाहेरील पार्किंगमध्ये दुचाकी पेटल्या; १०-१२ दुचाकी खाक
8
भिवंडीत उड्डाणपुलावर दोन भरधाव कारचा अपघात, दुचाकीस्वाराचा थेट रस्त्यावर पडून दुर्दैवी मृत्यू
9
यमुनेचा रौद्रावतार! पुरग्रस्तांच्या छावण्यांतही पाणी घुसले; २०१३ ची पातळी ओलांडली
10
मराठा आंदोलन संपताच राज ठाकरे वर्षा बंगल्यावर; घेतले गणपतीचे दर्शन, मुख्यमंत्र्यांकडून स्वागत
11
जिओ कंपनी उदार झाली...! ९ वर्ष झाल्याचे सेलिब्रेशन करणार; एक महिन्याचा रिचार्ज फ्री देणार...
12
जीएसटी परिषदेबाबत पहिली बातमी! २५०० रुपयांच्या आतील चप्पल, बुटांवर ५ टक्के कर : रिपोर्ट
13
...तोपर्यंत उपोषण, शासन निर्णय फाडणे, होळी करणे थांबवा; छगन भुजबळांचं OBC कार्यकर्त्यांना आवाहन
14
प्रमोशन दिलं नाही, महिला कर्मचारी बॉसवर संतापली! 'असा' बदला घेतला की सगळेच अवाक् झाले
15
सावधान! ChatGPT सोबत गप्पा मारताय? तुमची प्रत्येक गोष्ट ऐकू शकतात पोलीस
16
येत्या काही महिन्यात देशात राजकीय बदल होणार; ‘हायड्रोजन बॉम्ब’चा अर्थ काय? २ नेत्यांचे मोठे दावे
17
उत्तर प्रदेशात एक खाजगी बस पाण्यात उलटली, एका मुलासह दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
18
निर्बंधांचा परिणाम...! सौदी अरेबियाने या भारतीय कंपनीला कच्च्या तेलाचा पुरवठा रोखला
19
पाण्याच्या खदाणीत मिळाला महिलेसह मुलीचा मृतदेह; कासारवडवलीतील घटना
20
जुलैपासून टेस्लाने किती बुकिंग मिळविली? एलन मस्कनाही अपेक्षित नव्हते...

Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्यांना..."; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2025 14:28 IST

Narendra Modi And Operation Sindoor : जाहीर सभेला संबोधित करताना मोदी म्हणाले की, ऑपरेशन सिंदूर हे दहशतवादाविरुद्धचं सर्वात मोठं ऑपरेशन आहे. आपल्या सैन्याने दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले आहेत. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी मध्य प्रदेशातील भोपाळ येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला सक्षमीकरण महासंमेलनात सहभागी झाले आणि अनेक प्रकल्पांची सुरुवात केली. याच दरम्यान जाहीर सभेला संबोधित करताना मोदी म्हणाले की, ऑपरेशन सिंदूर हे दहशतवादाविरुद्धचं सर्वात मोठं ऑपरेशन आहे. आपल्या सैन्याने दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले आहेत. 

"पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केवळ भारतीयांचं रक्त सांडलं नाही तर त्यांनी आपल्या संस्कृतीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी आमच्या समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न केला. दहशतवाद्यांनी भारताच्या नारीशक्तीला आव्हान दिलं आहे. हे आव्हान दहशतवाद्यांसाठी आणि त्यांच्या आकांसाठी काळ ठरलं आहे. ऑपरेशन सिंदूर हे भारताच्या इतिहासातील दहशतवाद्यांविरुद्धचं सर्वात मोठं आणि सर्वात यशस्वी ऑपरेशन आहे" असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे.

"आम्ही घरात घुसून मारू"

"आता आम्ही घरात घुसूनही मारू आणि दहशतवाद्यांना मदत करणाऱ्यांनाही त्याची मोठी किंमत मोजावी लागेल. भारतातील प्रत्येक नागरिक म्हणत आहे की, जर तुम्ही गोळी झाडली तर गोळीचं उत्तर गोळीनेच दिलं जाईल.पाकिस्तानी सैन्याने याचा विचारही केला नव्हता, तिथे जाऊन आमच्या सैन्याने दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. सिंदूर हे आमच्या परंपरेचं प्रतीक आहे, आता ते भारताच्या शौर्याचं प्रतीक आहे"  

"'ऑपरेशन सिंदूर हे नारीशक्तीच्या सामर्थ्याचं प्रतीक"

"ऑपरेशन सिंदूर हे आपल्या नारीशक्तीच्या सामर्थ्याचं प्रतीक बनलं आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की, या ऑपरेशनमध्ये बीएसएफने खूप मोठी भूमिका बजावली आहे. बीएसएफच्या मुली काश्मीरपासून गुजरातपर्यंत जबाबदारी घेत होत्या. त्यांनी सीमेपलीकडून होणाऱ्या गोळीबाराला प्रत्युत्तर दिलं आहे. बीएसएफच्या शूर कन्यांनी अद्भुत शौर्य दाखवलं आहे. संपूर्ण जग मुलींचे शौर्य पाहत आहे" असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाOperation Sindoorऑपरेशन सिंदूरIndian Armyभारतीय जवानPakistanपाकिस्तान