शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

तिहेरी तलाकवर अध्यादेश काढता, मग राम मंदिरासाठी का नाही?; शिवसेनेचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2018 18:18 IST

शिवसेना खासदार संजय राऊत यांचा मोदी सरकारला सवाल

लखनऊ: आगामी लोकसभा निवडणुकीआधी अयोध्येत राम मंदिराच्या उभारणीला सुरुवात व्हायला हवी, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. केंद्र सरकार एससी-एसटी कायदा आणि तिहेरी तलाकबद्दल अध्यादेश काढतं. मग त्यांनी राम मंदिराबद्दलही अध्यादेश काढावा, असं राऊत म्हणाले. खासदार संजय राऊत सध्या अयोध्येच्या दौऱ्यावर आहेत. या दरम्यान त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत मोदी सरकारवर निशाणा साधला. अयोध्या दौऱ्यादरम्यान अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी बांधण्यात आलेल्या अतिथीगृहात थांबलेल्या संजय राऊत यांनी पत्रकारांशी बातचीत केली. यावेळी त्यांनी अयोध्येतील राम मंदिराच्या मुद्यावरुन मोदी सरकाराला लक्ष्य केलं. 'केंद्र आणि राज्यात भाजपाचं सरकार आहे. इतकंच काय, राष्ट्रपती भवनातही भाजपाची सत्ता आहे. अयोध्येत राम मंदिराची उभारणी करण्यासाठी हीच योग्य वेळ आहे. आता मंदिर उभारलं नाही, तर मग कधी उभारणार?', असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तिहेरी तलाकविरोधात अध्यादेश आणणाऱ्या मोदी सरकारवर संजय राऊत यांनी सडकून टीका केली. 'एससी-एसटी कायदा, तिहेरी तलाकबद्दल अध्यादेश आणता. मग राम मंदिरासाठी अध्यादेश का काढला जात नाही?,' असा प्रश्न त्यांनी विचारला. अयोध्येत आजही राम तुरुंगात आहेत. त्यांना जास्त काळ या स्थितीत ठेवता येणार नाही, असं राऊत यांनी म्हटलं. लवकरच सर्वोच्च न्यायालयात अयोध्येतील राम जन्मभूमी प्रकरणाची नियमित सुनावणी होणार आहे. या न्यायालयीन प्रक्रियेवरदेखील त्यांनी भाष्य केलं. आस्थेचा निर्णय न्यायालयात होऊ शकत नाही. या प्रकरणात न्यायालयाचा निर्णय कोणी मान्यदेखील करणार नाही. त्यामुळे पंतप्रधानांनी या प्रकरणात अध्यादेश काढावा, असं ते म्हणाले.  

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरShiv SenaशिवसेनाNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा