शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

Narendra Modi: वाराणसीत गर्दीचा महापूर, टेलिप्रॉम्प्टर बाबा म्हणत मोदींवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2022 17:30 IST

मोदी यांच्या वाराणसी मतदारसंघात बूथ विजय संमेलन आयोजित करण्यात आले होते. त्यात हा प्रकार घडला.

वाराणसी – देशात २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी नावाची लाट देशभर पसरली आणि केंद्रात सत्ता परिवर्तन झालं. पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी सत्तेत आले. मोदी यांच्या रॅलीला प्रचंड प्रतिसाद मिळू लागला. मात्र आता ७ वर्षानंतर चित्र पालटल्यासारखं दिसत आहे. वाराणसी येथील एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करत असताना याठिकाणी अनेक खुर्च्या रिकाम्या असल्याचं पाहायला मिळालं. इतकचं नाही तर मोदी भाषण करतानाही अनेकजण निघून जात होते. एका माजी आयएएस अधिकाऱ्यानं या घटनेचा व्हिडिओ शेअर करत भाजपला चिमटा काढला आहे.

मोदी यांच्या वाराणसी मतदारसंघात बूथ विजय संमेलन आयोजित करण्यात आले होते. त्यात हा प्रकार घडला. वाराणसीच्या संपूर्णानंद संस्कृत विश्वविद्यालयाच्या मैदानावर ३ हजार ३६१ बूथ म्हणून २० हजारांहून अधिक भाजपाचे बूथ पदाधिकारी पोहचले होते. ते सगळे पंतप्रधान नरेंद्र मोदींची वाट पाहत होते. परंतु मोदी यांचे भाषण सुरु होताच अनेकजण खुर्ची सोडून जाताना दिसले. बूथ विजय संमेलनात भाजपा पदाधिकाऱ्यांना मोदी विधानसभा निवडणुकीसाठी विजयाचं मंत्र देत होते. परंतु हा कार्यक्रम अर्धा तास उशिराने सुरू झाला. त्यामुळे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते वाट पाहून थकले होते. त्यामुळे जेव्हा मोदींचे भाषण सुरू झाले तेव्हा ते अर्धवट सोडून अनेकजण माघारी परतले. माजी आयएएस अधिकारी सूर्यप्रतापसिंह यांनी ट्विटरवर मोदींच्या सभेतील गर्दीचा व्हिडिओ शेअर करत भाजपला चिमटा काढला आहे. या व्हिडिओत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आवाज ऐकायला येत असून रिकाम्या खुर्च्याही दिसून येत आहेत. भीड का महाप्रलय काशी मे, आवाज जानी पहचानी है सुन तो लो... असे कॅप्शन देत सिंह यांनी मोदींच्या सभेची खिल्ली उडवली आहे. तसेच, टेलिप्रॉम्पटर बाबा काशी मे... असेही त्यांनी म्हटलं आहे. मोदींच्या या सभेचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावरही शेअर झाले आहेत.

टॅग्स :VaranasiवाराणसीNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाElectionनिवडणूक