नवी दिल्ली - काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर पुन्हा एकदा जोरदार हल्ला केला आहे. भारताच्या विकासाची गाथा काँग्रेसने लिहिली. मात्र मोदींनी नोटाबंदी आणि गब्बर सिंह टॅक्सचा वापर करून त्याला पूर्णपणे उद्ध्वस्त केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बिनकामाचे व्यक्ती असून, कुणाचेही ऐकत नाहीत, असे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत नोटाबंदी आणि जीएसटी मोदी सरकारचे सर्वात मोठे अपयश म्हणून समोर येईल, अशा आशयाची बातमी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर करताना राहुल गांधी यांनी मोदींवर जोरदार टीका केली. काँग्रेसने देशाच्या विकासासाठी प्रयत्न केले. मात्र मोदींनी नोटाबंदी आणि जीएसटी लावून देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त केली, अशा आशयाचे ट्विट मोदींनी केले आहे. राहुल गांधी नोटाबंदी आणि जीएसटीवरून मोदी सरकारवर सातत्याने जोरदार टीका करत आहेत. दरम्यान, गेल्या वर्षभरात देशात एक कोटी लोकांच्या नोकऱ्या गेल्या आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी अनिल अंबानींकडून चोऱ्या करवत राहिलेत. मोदींनी जर अनिल अंबानींना चोऱ्या करू देण्याऐवजी देशासाठी काम केले असते तर देशातील तरुणांचे भविष्य एवढे असुरक्षित झाले नसते, असा टोला लगावला होता. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदीसुद्धा काँग्रेसवर जोरदार टीका करत आहेत. काँग्रेसनं देशवासीयांच्या डोळ्यात धूळफेक केली, अशा शब्दांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनीराफेल डीलवरून पलटवार केला आहे. काँग्रेसकडून संसदेसारख्या पवित्र वास्तूचा वापर स्वत:च्या मनोरंजनासाठी केला जात आहे. त्यांचा हा प्रयत्न संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी हाणून पाडला, असे म्हणत मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला. 'देशवासीयांच्या डोळ्यात धूळफेक करणाऱ्यांना, देशाच्या सुरक्षेबद्दल हलगर्जीपणा करणाऱ्यांना, आपल्या मनोरंजनासाठी पवित्र संसदेचा वापर करणाऱ्यांना संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी उघडं पाडलं आहे. 2004 ते 2014 या कालावधीत केंद्र सरकारनं देशाच्या सैन्याला कमकुवत करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी कट रचला. आता आमचं सरकार या कट कारस्थानातून देशाला बाहेर काढू पाहतं आहे. मात्र हे त्यांच्या डोळ्यात खुपतं आहे,' अशा शब्दांमध्ये मोदींनी काँग्रेसला लक्ष्य केलं.
नरेंद्र मोदी बिनकामाचे, कुणाचेही ऐकत नाहीत, राहुल गांधीची घणाघाती टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2019 08:33 IST
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर पुन्हा एकदा जोरदार हल्ला केला आहे.
नरेंद्र मोदी बिनकामाचे, कुणाचेही ऐकत नाहीत, राहुल गांधीची घणाघाती टीका
ठळक मुद्देकाँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर पुन्हा एकदा जोरदार हल्लाभारताच्या विकासाची गाथा काँग्रेसने लिहिली. मात्र मोदींनी नोटाबंदी आणि गब्बर सिंह टॅक्सचा वापर करून त्याला पूर्णपणे उद्ध्वस्त केलेपंतप्रधान नरेंद्र मोदी हे बिनकामाचे व्यक्ती असून, कुणाचेही ऐकत नाहीत