शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

चिनी ‘वेईबो’ माध्यमावरील खाते नरेंद्र मोदींनी बंद केले; अ‍ॅपबंदीनंतर लगेच उचलले पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2020 01:08 IST

माहीतगार सूत्रांनुसार ५९ चिनी अ‍ॅपवर बंदी घालण्याचे भारताने सोमवारी जाहीर केल्यानंतर लगेचच मोदी यांनी त्यांचे ‘वेईबो’ अकाऊंट बंद करण्याचे निर्देश दिले

नवी दिल्ली : चीनमधील ‘वेईबो’ या टिष्ट्वटरप्रमाणे लोकप्रिय असलेल्या समाजमाध्यमावरील गेले पाच वर्षे सुरू असलेले अकाऊंट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्णपणे बंद केले आहे. प्रोफाईल फोटोसह सर्व पोस्टस व कमेंटस् काढून टाकल्याने मोदींचे हे वेईबो अकाऊंट बुधवारी पूर्णपणे कोरे झाले होते.

माहीतगार सूत्रांनुसार ५९ चिनी अ‍ॅपवर बंदी घालण्याचे भारताने सोमवारी जाहीर केल्यानंतर लगेचच मोदी यांनी त्यांचे ‘वेईबो’ अकाऊंट बंद करण्याचे निर्देश दिले. ‘वेईबो’वरील ‘व्हीआयपी’ अकाऊंट बंद करण्याची प्रकिया अन्य अकाऊंटस्च्या तुलनेत अधिक किचकट आहे. त्यामुळे चीन सरकारकडून अधिकृत परवानगी घेऊन खाते बंद करावे लागल्याने थोडा वेळ गेला, असे सूत्रांनी सांगितले. लडाख सीमेवरील चीनच्या दुस्साहसामुळे २० भारतीय जवानांना पत्कराव्या लागलेल्या हौतात्म्याची पार्श्वभूमीही या अकाऊंट बंदीच्या निर्णयामागे आहे.

मोदींच्या या ‘वेईबो’ अकाऊंटवर आतापर्यंत एकूण ११५ पोस्ट टाकलेल्या होत्या. अधिकृत परवानगीने अकाऊंट बंद केले जाईपर्यंत यापैकी ११३ पोस्ट परिश्रमपूर्वक ‘मॅन्युअली’ काढून टाकल्या गेल्या.‘वीचॅट’वरील तीन पोस्ट गायब

  • भारताच्या बीजिंगमधील वकिलातीचे ‘वीचॅट’ या चीनच्या आणखी एका लोकप्रिय समाजमाध्यावर अधिकृत अकाऊंट आहे.
  • सीमेवरील तणाव वाढू लागल्यावर या अकाऊंटवर वकिलातीने टाकलेल्या तीन पोस्टस् १० दिवसांपूर्वी अचानक ‘गायब’ झाल्या होत्या. त्यात सीमातंट्यावर मोदींनी केलेल्या भाष्याचीही एक पोस्ट होती.
  • चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याची पहिली शिखर बैठक झाली, तेव्हा २०१५ मध्ये मोठा गाजावाजा करीत मोदींचे हे ‘वेईबो’ अकाऊंट सुरू केले गेले होते.
  • तेव्हापासून यंदाचा अपवाद वगळता, मोदी याच अकाऊंटवर पोस्ट टाकून १५ जून रोजी शी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायचे. मोदींच्या सर्व पोस्ट चिनी भाषेत टाकल्या जायच्या. आतापर्यंत मोदींच्या या खात्याचे २.४४ लाख ‘फॉलोअर्स’ होते. त्यात बहुतांश चिनी नागरिक होते.
टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीChinese Appsचिनी ऍप