शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

Cabinet Reshuffle: मराठमोळ्या नेत्याला मोदींकडून मोठी संधी?; पहिल्याच रांगेतल्या 'त्या' चेहऱ्याची दिल्लीत चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2021 16:09 IST

Narendra Modi Cabinet Reshuffle: संभाव्य मंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा संवाद; राज्यातील खासदार पहिल्या रांगेत

नवी दिल्ली: मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला आता थोडाच अवधी राहिला आहे. मोदींच्या मंत्रिमंडळातील अनेक बड्या नेत्यांनी राजीनामे दिले आहेत. आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्यासह महत्त्वाच्या मंत्रालयांचा कार्यभार असलेल्या नेत्यांनी राजीनामे दिले आहेत. त्यामुळे आज होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात नावं असलेल्या काहींना महत्त्वाची खाती मिळू शकतात. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी थोड्याच वेळापूर्वी संभाव्य मंत्र्यांशी संवाद साधला.

पंतप्रधान मोदी संभाव्य मंत्र्यांशी संवाद साधत असल्याचे दोन फोटो समोर आले आहेत. यापैकी एक फोटो समोरून काढण्यात आलेला आहे. यात सर्व संभाव्य मंत्री दिसत आहेत. फिजिकल डिस्टन्सिंग आणि मास्क असल्यानं सर्व उपस्थितांचे चेहरे नीट दिसत नाहीत. मात्र पहिल्या रांगेतील सर्वांचे चेहरे ओळखू येत आहेत. मोदींच्या उजव्या बाजूला पहिल्याच रांगेत भाजप खासदार नारायण राणे आहेत. राणेंना पहिल्याच रांगेत स्थान देण्यात आल्यानं त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे.बड्या मंत्र्यांचा राजीनामा, पण मोदींच्या मंत्रिमंडळातील या सहा चेहऱ्यांचं होऊ शकतं प्रमोशन, हे आहे कारण 

नारायण राणे यांच्या शेजारी काही अंतरावर सर्वानंद सोनोवाल आहेत. आसामचं मुख्यमंत्रिपद हिमंता बिस्व सरमा यांच्यासाठी सोडणाऱ्या सोनोवाल यांना महत्त्वाचं खातं मिळू शकतं. पक्ष नेतृत्त्वाच्या एका आदेशावर मुख्यमंत्रिपद सोडल्याचं बक्षीस त्यांनी मिळू शकेल. सोनोवाल यांच्या शेजारी भाजपचे खासदार ज्योतिरादित्य सिंधिया आहेत. सिंधिया यांनी त्यांच्या समर्थक आमदारांसह काँग्रेसला रामराम केला. त्यामुळेच मध्य प्रदेशात भाजपची सत्ता आली. त्यामुळे सिंधिया यांच्याकडेही मोठी जबाबदारी दिली जाऊ शकते. 

सिंधिया यांच्या शेजारी, मोदींच्या अगदी डावीकडे संयुक्त जनता दलाचे (जेडीयू) राष्ट्रीय अध्यक्ष आरसीपी सिंह आहेत. त्यांच्याकडेदेखील महत्त्वाचं मंत्रालय दिलं जाऊ शकतं. जेडीयूनं मोदींकडे ४ मंत्रिपदं मागितली आहेत. मोदींनी आतापर्यंतच कोणत्याच मित्रपक्षाला एकापेक्षा अधिक मंत्रिपदं दिलेली नाहीत. त्यामुळे जेडीयूची मागणी पूर्ण होते का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. राणे यांच्यामागे बसलेल्या पशुपती पारस यांना महत्त्वाचं खातं मिळू शकतं. लोकजनशक्ती पक्षाचे खासदार असलेल्या पारस यांनी चिराग पासवान यांची गोची करत संपूर्ण पक्षच ताब्यात घेतला आहे. त्यांच्या या राजकीय खेळीमुळे गेल्याच महिन्यात ते चर्चेत आले होते.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीJyotiraditya Scindiaज्योतिरादित्य शिंदेNarayan Raneनारायण राणे