शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

Narendra Modi Birthday : नरेंद्र मोदींनी आईसोबत घेतला जेवणाचा आस्वाद अन् आशीर्वाद! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2019 15:57 IST

वाढदिवसानिमित्त नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील आपल्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या आई हिराबेन यांचा आशीर्वाद घेतला.

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस आहे. देशभरातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून देश-विदेशातील प्रसिद्ध व्यक्ती, नेते मंडळी मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. 

दरम्यान, वाढदिवसानिमित्त नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील आपल्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या आई हिराबेन यांचा आशीर्वाद घेतला. यावेळी आईसोबत चर्चा केली आणि जेवण सुद्धा केले. त्यानंतर दिल्लीला रवाना झाले. नरेंद्र मोदी दरवर्षीप्रमाणे यंदाही आपल्या वाढदिवशी आईची भेट घेऊन तिचा आशीर्वाद घेण्यासाठी काल रात्री उशिरापर्यंत गुजरातच्या अहमदाबाद येथे दाखल झाले. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी, उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनी विमानतळावर जाऊन नरेंद्र मोदींचे स्वागत केले.  

आज नरेंद्र मोदींनी आपल्या वाढदिवसानिमित्त गुजरातच्या वेगवगळ्या भागात दौरा केला. यावेळी त्यांनी  केवाडियातील सरदार सरोवर धरण येथे भेट दिली. त्याठिकाणी असलेल्या वेगवेगळ्या प्रकल्पांची पाहणी केली. तसेच, येथील बटरफ्लाय गार्डनला भेट दिली. त्यानंतर नर्मदा नदीची पूजा आणि आरती केली. १०० पुजाऱ्यांद्वारे ही पूजा संपन्न झाली.  याशिवाय, गुरुदेश्वर दत्त मंदिरात त्यांनी पूजा आणि आरती केली. 

दरम्यान, ट्विटरवर #HappyBdayPMModi, #NarendraModiBirthday, #HappyBirthdayPM, #happybirthdaynarendramodi, #NarendraModi हे हॅशटॅग्‍स ट्रेंडिंगमध्ये आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह इतर केंद्रीय मंत्र्यांव्यतिरिक्त भाजपा नेत्यांनीही ट्‌विटरवरून मोदींचे अभिनंदन केले आहे. तसेच, कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांनी मोदींना शुभेच्छा दिल्या.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीGujaratगुजरातBJPभाजपा