शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
5
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
6
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
7
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
8
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
9
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
10
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
11
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
12
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
13
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
14
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
15
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
16
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
17
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
18
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
19
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
20
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर

तोटी, टाईल्स आणि पुतळ्यांवरून मोदींनी केला अखिलेश,मायावतींवर हल्ला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2019 22:48 IST

आज मुरादाबाद येथे झालेल्या सभेमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सपाचे प्रमुख अखिलेश यादव आणि बसपा अध्यक्षा मायावतींवर जोरदार हल्ला केला.

मुरादाबाद - लोकसभा निवडणुकीपूर्वी उत्तर प्रदेशात झालेल्या महाआघाडीमुळे भाजपासमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. दरम्यान, आज मुरादाबाद येथे झालेल्या सभेमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सपाचे प्रमुख अखिलेश यादव आणि बसपा अध्यक्षा मायावतींवर जोरदार हल्ला केला. यावेळी अखिलेश यादव यांचे वास्तव्य असलेल्या सरकारी निवासस्थानात झालेली तोट्या आणि टाईल्सची मोडतोड तसेच  मायावतींनी उभारलेले पुतळे यावरून मोदींनी या दोघांवरही निशाणा साधला. तसेच विरोधकांकडून देण्यात येणारे शिव्याशाप ऐकून मी शिव्याप्रुफ झालो आहे, असेही मोदींनी सांगितले. ''सकाळ-संध्याकाळ मला शिव्या देणे हाच सपा-बसपाता अजेंडा आहे.  काही काँग्रेसवाले मला शौचालयांचा सौदागर म्हणतात. तर सपाचे एक नेते म्हणाले की माझे बोलणे शौचालयापासून सुरू होते आणि शौचालयावर जाऊन संपते. पण बबुआजी शौचालयाच्या चौकिदारीचे महत्त्व काय आहे ते तुम्हाला समजू शकणार नाही. तुमच्याकडे परदेशी टाईल्स लावलेल्या विदेशी तोट्या असलेले टॉयलेट आहेत. पण त्या कोट्यवधी माता-भगिनींना शौचालयाचे महत्त्व विचारा ज्यांना तुम्ही अंधाराची वाट पाहण्यासाठी भाग पाडले होते.'' असा टोला मोदींनी लगावला. यावेळी मोदींनी मायावतींवरही टीका केली.''आज मायावतींचा मोठेपणा पाहा. त्या अखिलेश यांचा इतका सन्मान करत आहेत की महाआघाडीती एक उमेदवार ज्यांना बाबासाहेब आंबेडकरांना हार घालणेही मान्य नाही, अशा उमेदवाराठी मायावती मत  मागत आहेत. याच मायावती एकेकाळी नेताजींना वेड्यांच्या रुग्णालयात पाठवण्याचा सल्ला देत असत, मात्र अखिलेश यांना आज त्याचा विसर पडला आहे. राजकारण काय काय करवून घेईल याचा नेम नाही. आज हत्ती सायकलवर स्वार झाला आहे आणि निशाण्यावर चौकीदार आहे.,'' असा टोलाही मोदींनी लगावला. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीAkhilesh Yadavअखिलेश यादवmayawatiमायावतीUttar Pradesh Lok Sabha Election 2019उत्तरा प्रदेश लोकसभा निवडणूक 2019moradabad-pcमोरादाबाद