शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

96 तास, 38 बैठका अन् पाच राज्यांवर 'फोकस', कोरोनावर वार करण्यासाठी मोदी-शाहंचा टॉप गिअर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2020 13:33 IST

16 जूनला 21 राज्‍ये आणि केंद्रशासित प्रदेशांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक होईल. पुढचा दिवस उरलेली 15 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांकडून इनपुट्स घेण्यात आणि काही सूचना देण्यात जाईल. 96 तासांच्या या महामंथनातून पुढच्या दोन महिन्यांची रणनीती बाहेर येईल. 

ठळक मुद्देआपल्या सहकाऱ्यांकडून इनपुट्स घेतल्यानंतर 16-17 जूनला पंतप्रधान राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांची बैठक घेणार.दिल्‍लीत अमित शाहंची केजरीवालांसोबत बैठक5 राज्‍ये निश्चित केली असून त्यांच्यासाठी वेगळा प्लॅन तयार करण्यात येणार आहे, असे समजते.

नवी दिल्‍ली : कोरोना व्हायरसवर मात करण्याच्या दृष्टीने पुढील रणनीती, 96 तासांच्या आत होणाऱ्या 38 बैठकांमध्ये ठरवली जाणार आहे. याची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारीच कॅबिनेटच्या काही वरिष्ठ सहकाऱ्यांसोबत केली. आज (रविवार) केंद्रिय गृहमंत्री अमित शाह दिल्‍लीचे उपराज्‍यपाल अनिल बैजल आणि मुख्‍यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याशी महत्वाची चर्चा करणार आहेत. यानंतर 16 जूनला 21 राज्‍ये आणि केंद्रशासित प्रदेशांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक होईल. पुढचा दिवस उरलेली 15 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांकडून इनपुट्स घेण्यात आणि काही सूचना देण्यात जाईल. 96 तासांच्या या महामंथनातून पुढच्या दोन महिन्यांची रणनीती बाहेर येईल. 

CoronaVirus News: होऊ नयेत अमेरिकेसारखे हाल; म्हणून, कोरोनावर मात करण्यासाठी मोदी सरकारचा प्लॅन तयार

दिल्‍लीत अमित शाहंची केजरीवालांसोबत बैठक -गृह मंत्रालयात आज अमित शाह आणि अरविंद केजरीवाल यांची बैठक पार पडेल. यावेळी यात स्‍टेट डिजास्‍टर मॅनेजमेंन्ट अथॉरिटीचे (SDMA) अधिकारीही उपस्थित असतील. ऑल इंडिया इंस्‍टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (AIIMS) डायरेक्‍टर डॉ. रणदीप गुलेरियादेखील या बैटकीत भाग घेतील. कोरोनाने महाराष्ट्रानंतर दिल्लीचे हाल बेहाल केले आहेत. तेथे गेल्या दोन दिवसांत दोन-दोन हजारहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. दिल्लीची चर्चा काल पंतप्रधानांनी घेतलेल्या समीक्षा बैठकीतही झाली. यावेळी त्यांनी केंद्र, राज्य आणि एमसीडी प्रशासनाच्या समन्वयावर जोर देत, एकत्रितपणेच कोरोनावर मात केली जाऊ शकते, असे म्हटले आहे. 

CoronaVirus News: खोटारड्या चीनचा बुरखा टराटरा फाटला; 'एकट्या वुहानमध्ये तब्बल 36 हजार लोकांवर अंत्यसंस्कार'

दोन दिवस पंतप्रधानांचे महामंथन -आपल्या सहकाऱ्यांकडून इनपुट्स घेतल्यानंतर 16-17 जूनला पंतप्रधान राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांची बैठक घेणार आहेत. एकाच वेळी 29 राज्‍यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना वेळ देणे अशक्य असल्याने दो भागांत ही बैठक पार पडेल. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमाने होणाऱ्या या बैठकीत पंतप्रधान मोदी राज्यांची तयारी आणि पुढील रणनीतीवर चर्चा करतील. यांतील 5 राज्‍ये निश्चित केली असून त्यांच्यासाठी वेगळा प्लॅन तयार करण्यात येणार आहे, असे समजते.

CoronaVirus News: खुशखबर! मॉडर्नाची कोरोना व्हॅक्सीन अखेरच्या टप्प्यात, 'या' महिन्यात मिळू शकते 'गुड न्यूज'

अनलॉक-2, की लॉकडाउन 5.0?या बैठकीत अनलॉक-1च्या गाइडलाइन्सवर राज्‍यांचा फिडबॅक घेतला जाऊ शकतो. तसेच वाढत्या रुग्ण संख्येवरही चर्चा होऊ शकते. काही राज्यांनी लॉकडाउन कायम ठेला आहे आणि सक्तीही वाढवली आहे. इतर राज्येही पंतप्रधानांकडे अशा प्रकारची मागणी करू शकतात. रेल्वे सेवा अद्याप पूर्णपणे सुरू झालेल्या नाहीत. मात्र, अनलॉक-2 करण्याचा निर्णय झाला, तर या सेवाही सुरू होऊ शकतात.

दिलासादायक! कोरोना होतोय हद्दपार; 'या' 26 देशांमध्ये आता एकही रुग्ण नाही

समीक्षा बैठकीत पाच राज्‍यांवर भर -पंतप्रधान मोदींनी शनिवारी गृह मंत्री आणि आरोग्य मंत्र्यांसह काही वरिष्‍ठ प्रशासकीय आणि आरोग्य अधिकाऱ्यांसोबत समीक्षा बैठक केली. यानंतर, पीएमओने एका निवेदनात म्हटले आहे, की "एकूण कोरोनाबाधितांपैकी दोन तृतियांश कोरोनाबाधित पाच राज्यांतच आहेत आणि तेही विशेषतः मोठ्या शहरांत. यावेळी दिवसागणिक वाढणाऱ्या रुग्ण संख्येचा विचार करता बेड्सची  संख्या आणि सेवा अधिक चांगल्या करण्यासंदर्भात चर्चा झाली." पंतप्रधानांनी शहर आणि जिल्यांतील रुग्णालये आणि आयसोलेशन बेड्सच्या आवश्यकतेसंदर्भातही जाणून घेतले. त्यांनी आरोग्य मंत्रालयाला राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांसोबत एकत्रितपणे पुढील नियोजन करण्यासंदर्भात आदेश दिले आहेत.

CoronaVirus News: आश्चर्य! कोरोना व्हायरस अँटीबॉडीजसह बाळाचा जन्म, डॉक्टर हैराण; रुग्णालय म्हणते...

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शहाdelhiदिल्लीArvind Kejriwalअरविंद केजरीवाल