शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

PM मोदींच्या दौऱ्यापूर्वीच अमेरीकेकडून मिळाले 8300 कोटींचे रिटर्न गिफ्ट; पाहा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2023 16:56 IST

Narendra Modi America Visit : नरेंद्र मोदींच्या महत्त्वाकांक्षी ‘मेक इन इंडिया’ला मोठे बळ मिळणार.

Narendra Modi America Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यापूर्वीच देशासाठी एक मोठी बातमी आली आहे. मोदींच्या दौऱ्यापूर्वीच भारताला एक अब्ज डॉलर्सचे रिटर्न गिफ्ट मिळाले आहे. अमेरिकन 'चिप'मेकर मायक्रोन टेक्नॉलॉजीने एक अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीची घोषणा केली आहे, जी येत्या काळात 2 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचू शकते. चीन आणि अमेरिका यांच्यातील तणावामुळे अमेरिकन कंपन्यांनी भारतावर विश्वास दाखवायला सुरुवात केली आहे. सेमीकंडक्टरच्या बाबतीत जगाने चीनवर अवलंबून राहू नये, अशी अमेरिकेची इच्छा आहे. अशा परिस्थितीत जागतिक सेमीकंडक्टर बाजाराचे नेतृत्व भारताकडे सोपवण्याची तयारी सुरू आहे. या कारणास्तव भारत सरकारने भारतीय चिप निर्मात्यांना 10 अब्ज डॉलर्स देण्याची घोषणा केली आहे.

दोन अब्ज डॉलर्सचा करार होऊ शकतोमीडिया रिपोर्टनुसार, तज्ञांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील आठवड्यात अमेरिकेच्या दौऱ्यावर जाताच या कराराची घोषणा केली जाऊ शकते. एक अब्ज डॉलर्सची ही रक्कम दोन अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचू शकते. कराराला अंतिम स्वरूप देण्याची तयारी सुरू आहे. हा करार नरेंद्र मोदींच्या महत्त्वाकांक्षी ‘मेक इन इंडिया’ला मोठे बळ देणारा ठरणार आहे. तसेच, वॉशिंग्टनला चीनबाहेर सप्लाय चेन मजबूत करण्याची संधी मिळेल.

चीनमध्येही 600 मिलियनची गुंतवणूकअमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिव्हन यांनी मंगळवारी नवी दिल्लीत सांगितले की, दोन्ही देशांमधील तंत्रज्ञान व्यापारातील अडथळे दूर करणे हा मोदींच्या दौऱ्याचा महत्त्वाचा भाग आहे. दुसरीकडे, मायक्रोनने शुक्रवारी आपल्या चीनी प्लांटमध्ये नोकऱ्या निर्माण करण्यासाठी आणि स्थानिक बाजारपेठेला पाठिंबा देण्यासाठी $600 मिलियन गुंतवणूक करण्याचे आश्वासन दिले आहे. दरम्यान, या करारावर भारताच्या तंत्रज्ञान मंत्रालय आणि परराष्ट्र मंत्रालयाकडून अद्याप कोणतेही विधान आलेले नाही आणि मायक्रोननेदेखील याबद्दल कोणतेही भाष्य केलेले नाही.

जपानमध्ये उभारला जाणार NextGen प्लांटवाढत्या चिनी तणावामुळे तैवानसारख्या आशियाई उत्पादन केंद्रांवर जगाचे अवलंबित्व कमी होत असल्याने अमेरिका प्रगत चिपमेकिंगमध्ये विविधता आणण्याचा प्रयत्न करत आहे. अमेरिकेतील सर्वात मोठी चिप निर्माता कंपनी मायक्रोनने जपानमध्ये उभारल्या जाणार्‍या $3.6 अब्जाच्या नेक्स्टजेन प्लांटसाठी आर्थिक पाठबळही मिळवले आहे. 21 जून रोजी मोदींचा पहिला औपचारिक दौरा सुरू होत आहे. दुसऱ्या दिवशी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन व्हाईट हाउसमध्ये त्यांच्यासाठी मेजवानीचे आयोजन करतील. पंतप्रधान मोदी अमेरिकन काँग्रेसलाही संबोधित करणार आहेत.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीJoe Bidenज्यो बायडनAmericaअमेरिकाbusinessव्यवसायInvestmentगुंतवणूक