शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

स्वबळाची भाषा करणारे 'स्वाभिमानी' नारायण राणे भाजपाच्या बैठकीला, अमित शहांनाही भेटणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2019 18:58 IST

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि वरिष्ठ नेते नारायण राणेंनी लोकसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढण्याची घोषणा केली आहे.

नवी दिल्ली-  राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि वरिष्ठ नेते नारायण राणेंनी लोकसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढण्याची घोषणा केली आहे. त्यानंतर आता ते भाजपा खासदारांच्या बैठकीत सामील होणार आहे. विशेष म्हणजे स्वबळाची भाषा करणारे राणे दिल्लीत भाजपा खासदारांच्या बैठकीत कसे काय पोहोचले, याबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत.गेल्या काही दिवसांपासून राणे भाजपावर टीका करत सुटले आहेत. राणेंना भाजपानं आपल्या कोट्यातूनच राज्यसभेवर पाठवलं आहे. म्हणजेच ते भाजपापुरस्कृत खासदार आहेत. तरीही संधी मिळेल तिथे ते भाजपावर टीका करतात. राणे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर स्वाभिमान पक्ष काढला. हा पक्ष एनडीएत सामील झाल्यानंतर त्यांची भाजपाच्या कोट्यातून राज्यसभेवर वर्णी लागली. राणेंना किंवा त्यांच्या पुत्राला पुन्हा सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवायची असेल, तर आधी हा मतदारसंघ शिवसेनेकडून सोडवून घ्यावा लागेल. सेना आणि राणेंचे एकूण ‘मधूर’ संबंध बघता ती शक्यता कमीच दिसते.तसेच भाजपाही लोकसभा निवडणुकीत शिवसेनेबरोबर युती करण्यास आग्रही आहे. त्या मतदारसंघातून सध्या सेनेचे विनायक राऊत खासदार आहेत. त्यामुळे तो मतदारसंघ आपसुकच शिवसेनेकडे जाणार आहे, याची राणेंना पूर्वकल्पना आहे. त्यामुळेच राणेंनी स्वबळाची भाषा केली होती. परंतु राणे आता भाजपा खासदारांच्या दिल्लीतील बैठकीला पोहोचल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. राणेंची नेमकी भूमिका काय, हे अनेकांसाठी न उलगडणारं कोडंच आहे.पवारांच्या भेटीतून राणेंनी वेगळा पर्याय शोधला असल्याचे मानले जात होते. परंतु ही वैयक्तिक भेट असल्याचंही राणेंनी सांगितलं होतं. त्यामुळे एनडीएत असलेला राणे यांचा स्वाभिमान पक्ष भविष्यात महाआघाडीत दाखल होण्याच्या दृष्टीने ही साखरपेरणी असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. पण राणे दिल्लीत भाजपा खासदारांच्या बैठकीनंतर अमित शाहांची भेट घेणार आहेत. त्यामुळे अमित शाह आणि राणेंच्या बैठकीचा सर्वांच्या नजरा आहेत.  

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे