शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नॅनोसाठी 33 हजार कोटी दिले पण पंधरा दिवसात एकही नॅनो कार रस्त्यावर दिसली नाही - राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2017 16:03 IST

काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सध्या आपले सर्व लक्ष गुजरात विधानसभेची निवडणूक जिंकण्याकडे केंद्रीत केले आहे.

ठळक मुद्दे मागच्या 10 ते 15 दिवसात मला एकही नॅनो कार रस्त्यावर धावताना दिसली नाही.

अहमदाबाद - काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सध्या आपले सर्व लक्ष गुजरात विधानसभेची निवडणूक जिंकण्याकडे केंद्रीत केले आहे. मागच्या काही दिवसांपासून ते सतत गुजरातचा दौरा करत आहेत. नवसर्जन यात्रेदरम्यान शुक्रवारी पारडीमध्ये सभेला संबोधित करताना राहुल गांधींनी टाटा नॅनो प्रकल्पावरुन भाजपाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री असताना नॅनो कारचा प्रकल्प गुजरातमध्ये आणला होता. 

त्याच नॅनो प्रकल्पावरुन राहुलनी भाजपावर टीका केली. नॅनो प्रकल्पासाठी 33 हजार कोटी दिले पण मागच्या 10 ते 15 दिवसात मला एकही नॅनो कार रस्त्यावर धावताना दिसली नाही. गुरुवारीही एका सभेला संबोधित करताना राहुल यांनी हाच मुद्दा उपस्थित करत गुजरात मॉडेलवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. शेतक-यांकडून जमिनी घेऊन उद्योजकांना दिल्या. त्याबरोबर पाणी आणि वीजही दिली. पण उद्योजकांनी कशाचीही परतफेड केली नाही. हेच गुजरातच्या विकासाचे मॉडेल आहे का ? असा सवाल राहुल यांनी विचारला. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी रोजगार देण्यात अपयशी ठरले आहेत. त्यांनी वर्षाला दोन कोटी नोक-या देण्याचे आश्वासन दिले होते पण प्रत्यक्षात वर्षाला काही लाख नोक-या निर्माण होत आहेत असे राहुल म्हणाले. 

दक्षिण गुजरातच्या तीनदिवसीय दौ-यावर असतानाही राहुल गांधींनी  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर काळ्या पैशाच्या मुद्द्यावरून कठोर टीका केली होती. नोटाबंदीने देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली आहे, असे सांगतानाच त्यांनी जाहीर सभेत केंद्र व राज्य सरकारचे जातीयवादी राजकारण व कॉर्पोरेटचे हितसंबंध जोपासण्यासह अनेक मुद्दे उपस्थित केले होते. जागतिक बँकेच्या अहवालाबाबत ते म्हणाले की, अर्थमंत्र्यांनी छोट्या व मध्यम व्यावसायिकांशी १० मिनिटे बोलावे व त्यांना विचारावे की, त्यांच्या व्यवसायात सुगमता आली आहे काय? संपूर्ण देश ओरडून सांगेल की, व्यवसायात सुगमता बिलकूल आलेली नाही. तुम्ही हे सगळे उद्ध्वस्त केले आहे. तुमच्या नोटाबंदी व जीएसटीने हे सगळे नष्ट केले आहे असे राहुल गांधी म्हणाले. 

टॅग्स :Gujarat Election 2017गुजरात निवडणूक 2017Rahul Gandhiराहुल गांधी