शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

चंबळ खोऱ्यातील नंदिनी अशी बनली सर्वांत तरुण महिला C.A.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2023 06:14 IST

‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद

भोपाळ : एक काळ असा होता की, चंबळ खोऱ्यातील मुरैना हे नाव ऐकलं की मनात बंदुका, दरोडे असे भयावह चित्र उमटायचे; पण काळानुसार इथे बरेच काही बदलले आहे. नंदिनी अग्रवाल ही तरुणी या बदलाचे एक भक्कम उदाहरण ठरले आहे. मध्य प्रदेशच्या मुरैना या छोट्याशा जिल्ह्याची मुलगी नंदिनी २०२१ मध्ये चार्टर्ड अकाउंटंट परीक्षेत संपूर्ण भारतात ८३,००० उमेदवारांमधून प्रथम आली. अवघ्या १९ वर्षे ३३० दिवसांच्या वयात ती सीए झाली. अलीकडेच तिचे नाव जगातील सर्वांत तरुण महिला सीए म्हणून ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंदवले गेले. 

थेट दुसऱ्या इयत्तेत...n नंदिनीचे वडील नरेश कर सल्लागार व आई डिंपल गृहिणी आहेत. लहानपणापासूनच हुशार असलेल्या नंदिनीच्या शिक्षणासाठी पालकांनी कोणतीही कसर सोडली नाही. n ज्या वयात मुलांना हात धरून बाराखडी शिकवली जाते त्या वयात तिने हिंदी आणि इंग्रजी वाचायला-लिहायला सुरुवात केली, यावरून तिच्या प्रतिभेचा अंदाज येतो. n हे पाहून शाळा व्यवस्थापनाने थेट दुसऱ्या इयत्तेत दाखल केले आणि भाऊ सचिनसोबत तिचे शिक्षण सुरू झाले.

११ वीत स्वप्न : मी ११ वीत असताना एक गिनीज वर्ल्ड रेकॉर्डधारक आमच्या शाळेत आले. तेव्हा सर्वजण त्यांना खूप आदर देत होते. तेव्हापासून एखादा विक्रम रचायचा जो तोडणे कठीण असेल हे स्वप्न पाहिले. अखेर आता स्वप्न पूर्ण झाले. १२ ते १५ तासांच्या अभ्यासाचा क्रम मी कधीच मोडला नाही. ही शिस्त कामी आली.      - नंदिनी 

फक्त ऑनलाइन कोचिंग  नंदिनीने १३ व्या वर्षी १० वी आणि १५ व्या वर्षी १२ वी उत्तीर्ण केली. सोशल मीडिया व मोबाइलपासूनही अंतर राखले. सीएच्या अभ्यासासाठी कोणतेही थेट कोचिंग घेतले नाही. कमी वयात सीए झाल्यामुळे अप्रेंटिसशिपसाठी खूप अडचणी आल्या, पण यामुळे असे अडथळे पार करण्याचा अधिक दृढनिश्चय केला. सध्या ती मुंबईत इंटरनॅशनल कंपनीत नोकरीला आहे.

टॅग्स :chartered accountantसीएMadhya Pradeshमध्य प्रदेश