अहमदाबाद : पश्चिम आशियातील वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारताचे दुसरे एलपीजी वाहक जहाज ‘नंदा देवी’ मंगळवारी गुजरातमधील वाडिनार बंदरात सुरक्षित पोहोचले. या जहाजाने होर्मुज सामुद्रधुनी पार करत ४६,५०० मेट्रिक टन द्रवीकृत पेट्रोलियम वायू (एलपीजी) आणल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. यापूर्वी ‘शिवालिक’ हे पहिले जहाज सोमवारी मुंद्रा बंदरात पोहोचले होते.
देवभूमी द्वारका जिल्ह्यातील वाडिनार येथे ‘नंदा देवी’ जहाज लागल्यानंतर एलपीजी दुसऱ्या जहाजामध्ये हलवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. दीनदयाळ पोर्ट प्राधिकरणचे अध्यक्ष सुशील कुमार सिंह यांनी सांगितले की, हा एलपीजी ‘बीडब्लू बिर्च’ या जहाजात हस्तांतरीत केला जाणार असून, हे जहाज पुढे तामिळनाडूतील एन्नोर आणि पश्चिम बंगालमधील हल्दिया बंदरांवर माल उतरवेल. प्रतितास सुमारे १,००० टन वेगाने ही प्रक्रिया होणार असून, संपूर्ण ऑपरेशन पूर्ण होण्यासाठी दोन दिवस लागतील.
भारत सध्या सुमारे ८८ टक्के कच्चे तेल, ५० टक्के नैसर्गिक वायू आणि ६० टक्के एलपीजी आयात करतो.
२२ ध्वजांकित जहाजे व ६११ खलाशी अडकले -२८ फेब्रुवारी रोजी अमेरिका - इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर आणि त्याला इराणने दिलेल्या प्रत्युत्तरानंतर आखातात तणाव वाढला आहे. याआधी लागणाऱ्या एकूण गॅसपैकी सुमारे ३० टक्के आणि एलपीजीपैकी ८५-९० टक्के पुरवठा सौदी अरेबिया व यूएईसारख्या आखाती देशांतून होत होता.सध्या पर्शियन आखातात भारताची २२ ध्वजांकित जहाजे आणि ६११ खलाशी अडकले असून, त्यांना सुरक्षित मार्ग उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
भारतीय जहाजे होर्मुजमधून सुरक्षित स्थळी सध्याच्या परिस्थितीनुसार, 'नंदा देवी' हे मालवाहू जहाज होर्मुजच्या क्षेत्रातून माघार घेत गुजरातच्या किनाऱ्यावर सुखरूप परतले आहे. याच धर्तीवर, 'स्वर्ण माला' या तेलवाहू जहाजाने ओमानच्या आखातातून आपला मार्ग बदलला असून, 'एम.व्ही. विनायक' हे कंटेनर जहाज सध्या भारतीय नौदलाच्या 'ऑपरेशन संकल्प' अंतर्गत सुरक्षित देखरेखीखाली आहे.
Web Summary : Amidst West Asia tensions, LPG carrier 'Nanda Devi' safely reached Gujarat's Vadinar port with 46,500 MT of LPG. It will transfer cargo to 'BW Birch' for distribution. Indian ships are rerouting to avoid conflict zones.
Web Summary : पश्चिम एशिया तनाव के बीच, एलपीजी वाहक 'नंदा देवी' 46,500 मीट्रिक टन एलपीजी के साथ गुजरात के वाडिनार बंदरगाह पर सुरक्षित रूप से पहुंचा। यह वितरण के लिए 'बीडब्ल्यू बर्च' को कार्गो स्थानांतरित करेगा। भारतीय जहाज संघर्ष क्षेत्रों से बचने के लिए मार्ग बदल रहे हैं।