शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत भाजप, शिंदेसेनेचे २०७ जागांवर एकमत, २० जागांचा तिढा; ठाण्यात १२ जागांवरून अडले घोडे; आज तोडगा शक्य
2
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २८ डिसेंबर २०२५: आनंदाचा दिवस; शारीरिक व मानसिक सौख्य मिळेल!
3
धुक्याचा विळखा अन् प्रवाशांचा खोळंबा! इंडिगोच्या ५७ फ्लाईट्स रद्द; DGCA कडून 'फॉग पिरियड' जाहीर
4
‘केडीएमसी महापालिकेत ‘ब्रँड’वाल्यांचा बँड वाजवा’; ठाकरे बंधूंचे नाव न घेता शिंदे यांनी टीका
5
उमेदवाराची शिफारस करणाऱ्या एमआयएम पदाधिकाऱ्यांना द्यावी लागणार लिखित हमी, जलील यांनी घेतल्या इच्छुकांच्या मुलाखती
6
काँग्रेसचे ५ जानेवारीपासून ‘मनरेगा बचाव’ आंदोलन, मल्लिकार्जुन खरगे यांची घोषणा
7
केवळ १२ जागांवरून ठाण्यात अडली भाजप-शिंदेसेनेची चर्चा; तिसरीही बैठक निर्णयाविना; आज फैसला होण्याची शक्यता
8
आयुक्तांना विकले चक्क ११०० रुपयांना पूजेचे ताट! वेशांतरामुळे उघड झाला शनैश्वर देवस्थानातील प्रकार 
9
पालकमंत्री, आमदारांमध्ये संघर्ष; शिंदेसेना, राष्ट्रवादी देणार टक्कर 
10
चांदी ‘जीएसटी’सह अडीच लाख पार; १४,५०० वाढ
11
महामुंबईसाठी चित्रपट, नाट्यकलावंतांचा जाहीरनामा; महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काय म्हणतात कलाकार?
12
‘अरवली’बाबत सुप्रीम कोर्टाने स्वत: घेतली दखल, सरन्यायाधीश सोमवारी करणार सुनावणी
13
मूर्ती लहान, किर्ती महान! U19 वर्ल्ड कपआधी BCCI नं वैभव सूर्यवंशीकडे दिली थेट कॅप्टन्सीची जबाबदारी
14
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
15
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
16
India U19 Squad For ICC Men’s U19 World Cup : तोच पॅटर्न! अंडर १९ वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची घोषणा
17
तैवानमध्ये मोठा भूकंप, इमारती हादरल्या, लोकांमध्ये दहशत, आसामपर्यंत जाणवले धक्के
18
ठाण्यात मनसेला मोठा धक्का, राजन गावंड यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश   
19
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
20
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
Daily Top 2Weekly Top 5

नानाजी देशमुख, प्रणव मुखर्जी आणि भूपेन हजारिका यांना देशातील सर्वोच्च ‘भारतरत्न’ सन्मान जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2019 06:33 IST

प्रख्यात सामाजिक कार्यकर्ते नानाजी देशमुख, माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि नामवंत संगीतकार भूपेन हजारिका यांची या वर्षीच्या देशातील सर्वोच्च अशा भारतरत्न सन्मानासाठी निवड झाली आहे.

नवी दिल्ली : प्रख्यात सामाजिक कार्यकर्ते नानाजी देशमुख, माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि नामवंत संगीतकार भूपेन हजारिका यांची या वर्षीच्या देशातील सर्वोच्च अशा भारतरत्न सन्मानासाठी निवड झाली आहे. यापैकी नानाजी देशमुख व भूपेन हजारिका यांना हा सर्वोच्च सन्मान मरणोत्तर जाहीर झाला आहे. यंदा महात्मा फुले व सावित्रीबाई फुले या दाम्पत्याला ‘भारतरत्न’ दिले जाईल, अशी चर्चा गेले काही दिवस सुरू होती, पण तीन वेगवेगळ््या क्षेत्रांतील नामवंतांचा सन्मान करण्याचे केंद्र सरकारने ठरविले.नानाजी देशमुख यांचा जन्म परभणी जिल्ह्यातील कडोली गावी झाला. शिक्षण पूर्ण करण्यासाठी राजस्थानच्या सिकर जिल्ह्यात गेले आणि तिथे माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर बिट्स पिलानीमधून महाविद्यालयीन शिक्षण घेतले. महाविद्यालयात असताना राष्ट्रीयस्वयंसेवक संघाशी त्यांचा संबंध आला. नंतर त्यांनी राजस्थान, उत्तर प्रदेशात कामाला सुरुवात केली. पुढे जनसंघ व जनता पार्टी यांमध्येही ते सक्रिय होते. जयप्रकाश नारायण यांच्या चळवळीत ते अग्रस्थानी होते. काही काळ ते खासदारही होते. वयाच्या ६0 व्या वर्षी सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेतलेल्या नानाजी देशमुख यांनी मध्य प्रदेशातील चित्रकुटमध्ये जाऊ न आदिवासी व मागास समाजात काम सुरू केले. त्यांचे निधन ९३ व्या वर्षी २0१0 मध्ये झाले.तर आसाममध्ये १९२६ साली जन्मलेल्या भूपेन हजारिका यांनी आसामीच नव्हे, तर अनेक बंगाली व हिंदी चित्रपटांना व हजारो गीतांना संगीत दिले. त्यांच्या सर्व गीतांवर लोकसंगीताचा मोठा प्रभाव होता. ते स्वत: गीतकार, गायक, दिग्दर्शकही होते. त्यांना संगीतासाठीचे अनेक पुरस्कार मिळाले असून, ‘पद्मभूषण’ व ‘पद्मविभूषण’ या पुरस्कारानेही यापूर्वी सन्मानित करण्यात आले होते. भूपेन हजारिका यांची ‘दिल हूं हूं करे’ ‘गंगा बहती है क्यूं’ आदी गाणी आजही रसिकांच्या तोंडी आहेत. त्यांचे २0११ साली मुंबईत निधन झाले.प्रणव मुखर्जी यांची माजी राष्ट्रपती आणि काँग्रेसचे नेते म्हणून ओळख सर्वांना आहे. केंद्र सरकारमध्ये त्यांनी इंदिरा गांधी यांच्या काळापासून अनेक वर्षे मंत्री म्हणून काम केले आहे. ते २0१२ ते २0१७ या काळात भारताचे राष्ट्रपती होते. राष्ट्रपतीपद सोडल्यानंतर ते रा. स्व. संघाच्या कार्यक्रमासाठी नागपूरला गेले होते. तिथेही मुखर्जी यांनी आपले म्हणणे संघ कार्यकर्त्यांसमोर ठामपणे मांडले होते. भारतरत्न पुरस्कार हा फारच मोठा सन्मान असून, अतिशय विनम्रपणे मी तो स्वीकारत आहे, असे प्रणवदा आज म्हणाले.पंतप्रधानांनी केले अभिनंदनपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोन करून त्यांचे अभिनंदन केले. प्रणव मुखर्जी यांचे पुत्र अभिजीत म्हणाले की, हा एका काँग्रेसजनाचाही सन्मान आहे.>या नामवंतांचाही ‘भारतरत्न’ने झाला सन्मानमहर्षी धोंडो केशव कर्वे, पांडुरंग वामन काणे, विनोबा भावे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर,जे. आर.डी. टाटा, लता मंगेशकर, भीमसेन जोशी, सचिन तेंडुलकर, नानाजी देशमुख