शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

जीएसटी कर प्रणालीनं प्रभावित होऊन त्यांनी तिन्ही मुलींचं केलं नामकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2017 14:02 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जीएसटीसारखी नवी कर प्रणाली आणली. या कर प्रणालीमुळे अनेक जण प्रभावित झाले.

नवी दिल्ली, दि. 11 - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जीएसटीसारखी नवी कर प्रणाली आणली. या कर प्रणालीमुळे अनेक जण प्रभावित झाले.  मोदी सरकारनं लागू केलेल्या वस्तू आणि सेवा करा (गुड्स अँड सर्व्हिसेस् टॅक्स)मुळे लोक किती प्रभावित झाले, याचं उत्तम उदाहरण सूरतमध्ये समोर आलं आहे. सूरतमधल्या एका महिलेने तिन्ही मुलींची नावेच GST च्या आद्याक्षरांवरून ठेवल्यानं ती सध्या चर्चेत आली आहे. गारवी, सांची आणि तारवी अशी मुलींची नावं तिने ठेवली असून, तिघींचीही जी, एस, टी या आद्याक्षरांनी नावं सुरू होतायत. सूरतच्या कंचन पटेल ही महिला म्हणाली, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जीएसटी म्हणजेच एक टॅक्स- एक देश या कर प्रणालीमुळे आम्ही प्रेरित झालो आहोत. त्यामुळेच आम्ही जीएसटीच्या आद्याक्षरांवरून मुलींचं नामकरण केलं आहे. कंचन पटेल यांनी काही दिवसांपूर्वीच तीन मुलींना जन्म दिला. त्यानंतर त्यांनी त्या मुलींचं नामकरण केलं आहे.  यापूर्वी 1 जुलै रोजी राजस्थानमध्ये जन्माला आलेल्या मुलीचं नाव 'जीएसटी' ठेवण्यात आलं होतं. तसेच छत्तीसगडच्या वैकुंठपूरमध्येही 1 जुलैला जन्माला आलेल्या मुलीचं नाव जीएसटी ठेवण्यात आलं होतं. याच दिवशी मध्यरात्री देशभरात जीएसटी लागू झाला होता. 

संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये जीएसटी लागू करण्याचा कार्यक्रम सुरू असतानाच राजस्थानमध्ये एका मुलाने जन्म घेतला. देशातील करप्रणालीत झालेल्या क्रांतिकारी बदलाच्या ऐतिहासिक क्षणी मुलाचा जन्म झाल्याने आनंदीत झालेल्या आईने त्याचे नाव जीएसटी ठेवण्याचा निर्णय घेतला. 

राजस्थानमधील ब्यावर येथे काल मध्यरात्री बरोब्बर 12 वाजून 2 मिनिटांनी एका मुलाने जन्म घेतला. हा मुलगा आणि त्याच्या आईचा एक  सेल्फी व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये ऐतिहासिक क्षणी मुलाचा जन्म झाल्याने आई आनंदीत दिसत आहे.  तसेच या मुलाचे नाव जीएसटी असे ठेवत आईने मुलाचा जन्म अविस्मरणीय बनवला आहे. 

देशभरात बहुप्रतीक्षित जीएसटी म्हणजे वस्तू आणि सेवा करप्रणाली अखेर कालपासून लागू झाली. शुक्रवारी मध्यरात्री बरोबर 12 वाजता संसदेच्या सेंट्रल हॉलमधून पूर्ण देशात वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) लागू करण्याची घोषणा करण्यात आली. जीएसटीच्या निमित्ताने आर्थिक सुधारणांच्या नव्या मार्गावर देश वाटचाल करणार आहे. हा खऱ्या अर्थाने गुड अँड सिंपल टॅक्स आहे, या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या ग्वाहीला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी अप्रत्यक्ष दुजोरा देत चौदा वर्षांची एक यात्रा सफळ संपूर्ण झाल्याची भावना व्यक्त केली होती.