शहरं
Join us  
Trending Stories
1
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
2
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
3
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
4
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
5
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य
6
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
7
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीसोबत करणार हातमिळवणी?
8
IPL 2025: आयपीएल रद्द होणार की, उर्वरित सामनेही खेळवले जाणार? बीसीसीआयनं घेतला 'हा' निर्णय
9
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
10
महामृत्युंजय मंत्र कधी व कोणासाठी म्हणावा? त्यामुळे नेमका कसा लाभ होतो? जाणून घ्या!
11
Operation Sindoor Live Updates: राज्यांना आपत्कालीन अधिकारांचा वापर करण्याची परवानगी, गृह मंत्रालयाचा निर्णय
12
India Pakistan Update: हवाई दलाच्या लढाऊ विमानांसाठी ओझरचे एचएएल 'हाय अलर्ट'वर !
13
हा दिग्गज १०८ अब्ज डॉलर्सची संपत्ती दान करणार; ठरणार आजवरचं सर्वात मोठं परोपकारी कार्य
14
भारतीय सेनेचा 'सुपर हीरो', पाकिस्तानच्या नाकीनऊ आणलं! काय आहे 'आकाश'मध्ये खास?
15
'सर, मला फक्त एकदा परवानगी द्या, मी पाकिस्तानविरूद्ध..."; बिहारच्या शिक्षकाचे पत्र व्हायरल
16
जगा आणि जगू द्या..; मेहबूबा मुफ्तींचे रडत-रडत भारत आणि पाकिस्तानच्या प्रमुखांना आवाहन
17
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर RSSची मोदी सरकारच्या पाठीवर कौतुकाची थाप, भारतीय सैन्याचे केले अभिनंदन
18
Gold Price 9 May : भारत-पाक तणावादरम्यान सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर?
19
India Pakistan War: 'आमचे पंतप्रधान भित्रे, ते मोदींचे नाव घ्यायला घाबरतात'; पाकिस्तानी खासदाराने त्यांच्याच सरकारला सुनावले
20
"सत्याला अभिनय करु नको असं सांगितलंय", महेश मांजरेकरांचा लेकाबद्दल खुलासा, म्हणाले- "ट्रोल केल्यावर मी..."

नाव गांधीबाग पण म. गांधींचेच अस्तित्व नाही (भाग १)

By admin | Updated: January 29, 2015 23:17 IST

- आज महात्मा गांधी यांची पुण्यतिथी : गांधीजींच्या पुतळ्याचा महापालिकेला विसर

- आज महात्मा गांधी यांची पुण्यतिथी : गांधीजींच्या पुतळ्याचा महापालिकेला विसर
नागपूर : इतिहासाच्या पोटात अनेक सत्य दडली असतात पण प्रत्येकवेळी खरा इतिहास समोर येत नाही. माणसे संपतात, काळ बदलतो पण इतिहास निमुटपणे साऱ्या नोंदी करीत असतो. इतिहासाकडे गंभीरपणे पाहिले आणि सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर अनेक रंजक आणि थक्क करणाऱ्या नोंदी, आठवणी आपल्याला सापडतात आणि आतापर्यंत आपण समजत होतो, ते काही तरी वेगळे असल्याचाही प्रत्यय येतो. एखाद्या वस्तीचे, स्थळाचे, शहराचे नावही तसे का आहे, याचाही इतिहास असतोच पण आपण धावपळीच्या जीवनात इतके खोलात जात नाही. नागपुरातही सेंट्रल एव्हेन्युवर गांधीबाग उद्यान आहे. या उद्यानाचे नाव म. गांधींच्या नावाने गांधीबाग झाले आहे पण येथे गांधींजींचे अस्तित्वच दिसत नाही.
या उद्यानाला गांधीबाग नाव पडण्यामागे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे यत्न आहेत. राष्ट्रसंतांनीच हे उद्यान उभारले, स्वच्छता केली आणि या उद्यानाला गांधीबाग असे नाव दिले. म. गांधी यांच्या नावाने असलेले हे उद्यान आहे पण येथे म. गांधी यांचा पुतळा उभारण्यात आलेला नाही. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म. गांधी यांचे अनुयायी होते. ३० जानेवारी १९५३ रोजी म. गांधी यांचा स्मृतिदिन नागपुरात मोठ्या प्रमाणात आयोजित करण्यात आला. राष्ट्रसंतांनीच हा कार्यक्रम आयोजित केला होता. राष्ट्रसंतांनी गांधीजींची पुण्यतिथी त्यांच्या विचारांवर अमल करून साजरी करण्याचे ठरविले. त्यासाठी त्यांनी तत्कालीन लेंडी तलाव परिसराची निवड केली. या परिसरात त्यावेळी खूप घाण होती आणि तेथे छोटासा तलाव होता. लोक येथे शौचासाठी येत. त्यामुळे परिसरात दुर्गंधी, अनारोग्य पसरले होते. म. गांधी स्वच्छतेचे पुजारी होते. परिसर स्वच्छ आणि प्रसन्न ठेवण्यासाठी त्यांनी अनेकांना प्रेरित केले. त्यांच्या याच विचाराने प्रभावित होऊन राष्ट्रसंतांनी लेंडी तलाव परिसराची निवड म. गांधींच्या पुण्यतिथीसाठी केली आणि आपल्या शिष्यपरिवारासह या तलावाची स्वच्छता करण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रसंतांनी १५०० स्वयंसेवकांच्या सहकार्याने हा तलाव परिसर स्वच्छ केला. यासाठी सर्व नागरिकांनी येथे श्रमदान केले. त्यांनी दलदलीने आणि घाणीने भरलेला हा तलाव बुजविला आणि परिसर स्वच्छ केला. तेथे वृक्षांची लागवड केली आणि उद्यान तयार झाले.