शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

भ्रष्टाचारासाठी ‘आंबेडकर प्रोजेक्ट’चे नाव बदलविले, राहुल गांधींचा घणाघाती आरोप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2018 19:56 IST

तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री  डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा  अपमान करीत आहेत. येथील ‘आंबेडकर प्रोजेक्ट’चे नाव बदलवून कालेश्वरम प्रोजेक्ट असे रिडिझाईन करून भ्रष्टाचार केला जात असल्याचा आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला. 

- बी. संदेश आदिलाबाद - तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री  डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा  अपमान करीत आहेत. येथील ‘आंबेडकर प्रोजेक्ट’चे नाव बदलवून कालेश्वरम प्रोजेक्ट असे रिडिझाईन करून भ्रष्टाचार केला जात असल्याचा आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला. आदिलाबाद जिल्ह्यातील भैसा येथे शनिवारी काँग्रेसच्या जाहीर सभेत ते बोलत होते. डिसेंबरमध्ये तेलंगणा विधानसभेची निवडणूक होऊ घातली आहे. त्याच्या प्रचार सभेसाठी राहुल गांधींनी तेलंगणा दौरा केला. ते म्हणाले, ३८ हजार कोटींच्या कामाचे रिडिझायनिंग करून एक लाख कोटी रुपये करण्यात आले. तेलंगणाचे मुख्यमंत्री के.सी.आर यांनी आपल्या नातेवाईकांसाठी भ्रष्टाचार केला. दलित, आदिवासी व अल्पसंख्यकांचे मुख्यमंत्री नुकसान करीत आहे.

यूपीए सरकार आल्यास जल, जंगल, जमीन कायदा आणून  जमीन अधिग्रहण कायदा आणला जाईल. देशात व तेलंगणात काँग्रेसचे सरकार आल्यावर आदिवासी बिल आणल्याशिवाय राहणार नाही, अशी ग्वाही काँग्रेस अध्यक्षांनी यावेळी दिली. हिंदुस्थानच्या चौकीदाराने चोरी केली असा उल्लेख करीत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही निशाणा साधला. अनिल अंंबानी यांच्यावरही भ्रष्टाचाराचा आरोप केला. यावेळी प्रदेशाध्यक्ष उत्तम कुमार रेड्डी, महेश्वरा रेड्डी, विजय शांती, डी.के. अरुणा, सविता इंद्रा रेड्डी, रामचंद्र रेड्डी, नारायणराव पाटील, साजीद खान, रामराव पाटील आदी उपस्थित होते.  कर्जमाफीचे आश्वासनतेलंगणातील शेतक-यांचे दोन लाख रुपये कर्ज माफ केले जाईल, बेरोजगारांसाठी काँग्रेस रात्रंदिवस प्रयत्न करेल, बेरोजगारांना तीन हजार रुपये दिले जाईल आदी आश्वासने यावेळी राहुल गांधींनी दिली.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीTelanganaतेलंगणा