शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

नालंदा हेच पेपरफुटीचे केंद्र ! २००३ साली कॅट गैरव्यवहार, नीट-यूजी प्रकरणातील आरोपी याच जिह्यातील

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2024 07:12 IST

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे नालंदा जिल्ह्याचे रहिवासी असून त्यांचा जिल्हा या प्रकरणांमुळे चर्चेत आला आहे.

एस. पी. सिन्हा

लोकमत न्यूज नेटवर्क, पाटणा : नीट-यूजीप्रमाणेच इतर परीक्षांच्या प्रश्नपत्रिका फुटल्याचे प्रकरण उजेडात आले की, या गैरकृत्याची पाळेमुळे नालंदा जिल्ह्यात असल्याचे दिसून आले आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार हे नालंदा जिल्ह्याचे रहिवासी असून त्यांचा जिल्हा या प्रकरणांमुळे चर्चेत आला आहे.

याआधी आयआयएम, एमबीबीएस, कॅट, बँकेच्या परीक्षांच्या प्रश्नपत्रिका फोडण्याच्या प्रकरणांत रंजीत डॉन असल्याचे आढळले. तो नालंदा जिल्ह्याचा रहिवासी आहे. २०१२ साली फूड इन्स्पेक्टर या पदासाठीच्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फोडल्याप्रकरणी संजीव मुखियाचे नाव पुढे आले होते. अशाच एका प्रकरणात दीपक कुमार या आरोपीचे नाव चर्चेत होते. तोही नालंदा जिल्ह्याचाच रहिवासी आहे. 

संजीव मुखिया हाच सूत्रधारनीट-यूजी प्रकरणाच्या पोलिस तपासात संजीव मुखिया ऊर्फ लूटन मुखिया याचे नाव समोर आले आहे. त्यानेच प्रश्नपत्रिका उपलब्ध करून दिल्याचा दावा करण्यात येत आहे. २००३ साली कॅट परीक्षेत झालेले गैरव्यवहार ते आताच्या नीट-यूजी परीक्षेचे प्रकरण यामागे नालंदा जिल्ह्यातील आरोपीच असल्याचे दिसून आले आहे.

यातील सत्य उजेडात आणू - तेजस्वी यादव

  • तेजस्वी यादव म्हणाले की, नीट-यूजी परीक्षेची प्रश्नपत्रिका कोणी फोडली याचा बिहार सरकारने तपास केला नाही तर राजद या प्रकरणातील सत्य उजेडात आणणार आहे.
  • या प्रकरणाचा सूत्रधार असल्याचा आरोप झालेल्या संजीव मुखिया याची विविध राजकीय नेत्यांसोबत छायाचित्रे असून ती आम्ही लवकरच जनतेसमोर ठेवणार आहोत. देशामध्ये भाजप व मित्रपक्षांची जिथे सरकारे आहेत, त्या राज्यांमध्ये सातत्याने प्रश्नपत्रिका फुटण्याच्या घटना घडत आहेत.   
  • परीक्षांची प्रश्नपत्रिका बिहारमध्ये फुटली होती. त्याच लोकांनी आता नीट-यूजी परीक्षेमध्ये देखील गैरव्यवहार केल्याचे आरोप होत आहेत. या प्रकरणातील संजीव मुखिया याची तपास यंत्रणांनी चौकशी करावी, अशी मागणी तेजस्वी यादव यांनी केली.
  • या प्रकरणातील सत्ताधारी जद(यू) आणि राष्ट्रीय जनता दल यांच्यात चांगली जुंपली आहे. जनता मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्याच पाठीशी आहे हे लोकसभा निवडणूक निकालांतून दिसून आले. मतदारांचे आभार मानण्यासाठी तेजस्वी यादव यांनी आयोजित केलेल्या यात्रेतून त्यांना पार काही फायदा होणार नाही, असे जदयूचे नेते म्हणत आहेत. 

लालूप्रसाद यांच्याशी संबंध का जोडता? जद(यू)चा सवालनीट-यूजी परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फोडल्याप्रकरणी आरोपींवर कडक कारवाई केली जाईल, असे जनता दल (यू) ने म्हटले आहे. या प्रकरणावरून बिहारमध्ये सत्ताधारी व विरोधी पक्षांत शाब्दिक चकमकी होत आहेत. दोन्ही पक्षांचे नेते एकमेकांवर तोंडसुख घेत आहेत.

जनता दल (यू)चे खासदार संजयकुमार झा यांनी सांगितले की, कोणत्याही घटनेचा राजदचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांच्या कुटुंबाशी संबंध का जोडला जातो, असा सवाल जनता दल (यू) चे खासदार संजयकुमार झा यांनी केला आहे. 

झा यांनी शनिवारी एका पत्रकार परिषदेत सांगितले की, नीट यूजी परीक्षेची प्रश्नपत्रिका फोडण्याच्या प्रकारामागे असलेल्या लोकांना पाठीशी घातले जाणार नाही. या प्रकरणाचा तपास जोवर पूर्ण होत नाही तोपर्यंत या विषयावर अधिक काही बोलणे उचित होणार नाही. मात्र, या प्रकरणात राजदचे नेते तेजस्वी यादव यांच्या निकटवर्तीयांची नावे पुढे येत आहेत. अशा सर्व घटनांचा संबंध तेजस्वी यादव यांच्याशी का जोडला जात आहे? हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे, असेही खासदार संजयकुमार झा म्हणाले.

टॅग्स :Biharबिहारexamपरीक्षाEducation Sectorशिक्षण क्षेत्रTejashwi Yadavतेजस्वी यादव