शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

नितीश कुमारांवरही हत्येचा आरोप आहे - लालूप्रसाद यादव

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2017 20:59 IST

नितीश कुमार यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी नितीश कुमार यांच्यावर घणाघाती आरोप केले आहे.

पाटणा, दि. 26 - बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर बिहारमध्ये राजकीय भूकंप आला असून सत्ताधारी जनता दल(यू) आणि राष्ट्रीय जनता दल यांच्यातील महायुती अखेर 20 महिन्यानंतर तुटली आहे.  नितीश कुमार यांनी राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी नितीश कुमार यांच्यावर घणाघाती आरोप केले आहेत. ते म्हणाले की, नितीश कुमार यांच्यावर भ्रष्टाचारापेक्षा अत्याचाराचा गंभीर आरोप आहे. ते भारतीय दंड विधान 302 चे आरोपी आहेत. त्यांनी तेजस्वी यादव यांच्याकडून स्पष्टीकरण मागितले. त्यामुळे जनता दल (यू) काही पोलीस स्टेशन नाही, स्पष्टीकरण द्यायला, असे लालूप्रसाद म्हणाले. याचबरोबर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून नितीश कुमार यांना भारतीय जनता पार्टीसोबत येण्याची ऑफर आली आहे. त्यामुळे नितीश कुमार यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याचे आधीच ठरविले होते, असाही आरोप लालूप्रसाद यादव यांनी केला. दरम्यान, काँग्रेस, आरजेडी आणि जेडीयूच्या आमदारांनी एकत्र येऊन नवीन मुख्यमंत्र्यांची निवड करावी असेही यावेळी लालूप्रसाद यादव म्हणाले. 

गेल्या काही दिवसांमध्ये लालू प्रसाद यादव आणि त्यांचे पूत्र व बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले आहेत. भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी राजीनामा द्यावा यासाठी नितीश कुमार यांच्यावरील दबाव सातत्याने वाढत होता.  मात्र, तेजस्वी यादव यांचा राजीनामा देणार नसल्याचे लालूप्रसाद यादव यांनी स्पष्ट केले होते. त्यानंतर बुधवारी संध्याकाळी पाटणामध्ये नितीश कुमारांनी जदयूच्या आमदारांची, खासदारांची आणि इतर नेत्यांची बैठक बोलावली होती. बैठकीनंतर नितीश कुमार राज्यपालांकडे आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला