शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात त्यांनी घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
4
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
5
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
6
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
7
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
8
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
9
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
10
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
11
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
12
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
13
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
14
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
15
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
16
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'
17
खळबळजनक! एकतर्फी प्रेमात वेडा झाला तरुण, १५ वर्षांच्या मुलीवर दिवसाढवळ्या झाडल्या गोळ्या
18
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
19
'दीवार'मधला चिमुकला आहे 'या' मराठी अभिनेत्रीचा मोठा भाऊ, कुटुंबासोबत परदेशात झाला स्थायिक
20
FD की सोने? गुंतवणुकीचा राजा कोण? बहुतेकांना यातील फायदे तोटे माहिती नाही, कशी करायची योग्य निवड?

नितीश कुमार यांच्या राजीनाम्यानंतर रात्रभर राजकीय घडामोडींना वेग

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2017 09:24 IST

नितीश कुमार यांनी बुधवारी संध्याकाळी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर बिहारमध्ये बुधवारी संध्याकाळपासून राजकीय घडामोडींना वेग आल्याचं पाहायला मिळालं आहे.

ठळक मुद्दे नितीश कुमार यांनी बुधवारी संध्याकाळी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर बिहारमध्ये बुधवारी संध्याकाळपासून राजकीय घडामोडींना वेग आल्याचं पाहायला मिळालं आहे.. नितीश कुमार यांचा राजीनामा, लालूप्रसाद यादव यांनी त्यानंतर नितीश कुमार यांच्यावर केलेले आरोप, विशेष म्हणजे नितीश कुमार यांच्या राजीनाम्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लगेचच ट्विटरवरून त्यांचं कौतुक केलंभ्रष्टाचाराचे आरोप असलेले बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी नितीश कुमार यांची इच्छा होती. पण दबावापुढे झुकायला ते तयार नव्हते

पाटणा, दि. 27- नितीश कुमार यांनी बुधवारी संध्याकाळी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर बिहारमध्ये बुधवारी संध्याकाळपासून राजकीय घडामोडींना वेग आल्याचं पाहायला मिळालं आहे. नितीश कुमार यांचा राजीनामा, लालूप्रसाद यादव यांनी त्यानंतर नितीश कुमार यांच्यावर केलेले आरोप, विशेष म्हणजे नितीश कुमार यांच्या राजीनाम्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लगेचच ट्विटरवरून त्यांचं केलेलं कौतुक, भाजपने नितीश कुमार यांना मुख्यमंत्रिपदासाठी दिलेला पाठिंबा तसंच सत्तास्थापनेची संधी मिळावी यासाठी आक्रमक झालेलं राष्ट्रीय जनता दल आणि त्यानंतर राज्यपालांकडून करण्यात आलेली नितीश कुमारांच्या शपथविधीची घोषणा, या सर्व घटना बिहारमध्ये रंगत असलेलं राजकीय नाट्य दाखविणाऱ्या आहेत. 

भ्रष्टाचाराचे आरोप असलेले बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी नितीश कुमार यांची इच्छा होती. पण दबावापुढे झुकायला ते तयार नव्हते. दोन दिवसांपूर्वी नितीश यांनी तेजस्वी यांची भेट घेऊन त्यांना भ्रष्टाचाराच्या आरोपांवर भूमिका स्पष्ट करण्याचा आग्रह धरला होता. पण बुधवारी तेजस्वी यादव मंत्रिपदाचा राजीनामा देणार नाहीत, असं लालू प्रसाद यादव यांनी जाहीर केलं.  नितीश कुमार यांनी बुधवारी मुख्यमंत्रिपद सोडण्याचा निर्णय घेतला.

बुधवारी संध्याकाळपासून नेमकं काय घडलं ?- बुधवारी संध्याकाळी नितीश कुमार यांची संयुक्त जनता दलाच्या आमदारांसोबत बैठक झाली.- आमदारांसोबतच्या बैठकीनंतर नितीश कुमार राज्यपाल केशरीनाथ त्रिपाठी यांच्या भेटीसाठी राजभवानाकडे गेले होते.- राज्यपालांच्या भेटीमध्ये नितीश कुमारांनी राज्यपालांकडे आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा सुपूर्द केला.-राज्यपालांकडे राजीनामा दिल्यानंतर नितीश कुमार यांनी प्रसारमाध्यमांसमोर येऊन मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्याचं सांगितलं.- नितीश कुमारांनी राजीनाम दिल्यानंतर काही वेळातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून नितीश कुमार यांचं अभिनंदन केलं.- नितीश कुमार यांच्या राजीनाम्याच्या घोषणेनंतर काहीवेळातच लालूप्रसाद यादव यांनी पत्रकार परिषद घेऊन नितीश यांच्यावर गंभीर आरोप केले.- दिल्लीत तेव्हा भाजपाच्या संसदीय मंडळाची सुरू होती.- भाजपाच्या केंद्रीय समितीची बैठक झाली व यामध्ये बिहारमध्ये पुन्हा निवडणुका घेण्याबाबत होकारार्थी मतं मांडण्यात आली- या बैठकीनंतर तासाभरात नितीश कुमार यांना मुख्यमंत्रिपदासाठी पाठिंबा देण्याचा भाजपाने निर्णय घेतला.- बिहार भाजपाकडून दिल्लीला राज्यातील राजकीय परिस्थितीचा अहवाल पाठवण्यात आला.- जदयू आणि भाजपचे राज्यभरातील आमदार पाटण्यात दाखल व्हायला सुरूवात झाली.- नितीश कुमार यांच्या निवासस्थानी जदयू आणि भाजपच्या आमदारांची बैठक पार पडली.-  बैठकीनंतर जदयू आणि भाजपच्या आमदारांनी नितीश कुमार यांना मुख्यमंत्री म्हणून पाठिंबा असल्याच्या पत्रावर सह्या केल्या.- त्यानंतर नितीश कुमार, सुशील मोदी राजभवनात दाखल झाले.- राजभवनातून बाहेर पडल्यानंतर गुरूवारी सकाळी १० वाजता नितीश कुमारांचा शपथविधी होइल, अशी घोषणा सुशील कुमार मोदींनी केली. - या घोषणेनंतर उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव राजभवनाकडे गेले होते.- राज्यपालांना भेटून तेजस्वी यादव यांच्याकडून सत्तास्थापनेचा दावा करण्यात आला- गुरूवारी सकाळी 10 वाजता नितीश कुमार आणि सुशील मोदी शपथ घेणार. - नितीश कुमार शुक्रवारी बहुमत सिद्ध करणार असल्याची सूत्रांची माहिती. - भाजप-जदयूचे 13-13 मंत्री शपथ घेणार असल्याची सूत्रांची माहिती.- बहुमत सिद्ध केल्यानंतर मंत्रीमंडळाचा विस्तार करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे.