शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

नाणार प्रकल्प विदर्भात हलविण्याचा विचार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 00:09 IST

कोणताही प्रकल्प एका जागेहून दुसऱ्या ठिकाणी हलविण्याबाबत एकतर्फी निर्णय घेता येत नाही.

नवी दिल्ली : स्थानिक रहिवाशांच्या विरोधामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील नाणारचा प्रस्तावित तेल शुद्धीकरण प्रकल्प विदर्भात हलविण्याबाबत चर्चा झालेली नाही. तसे संकेत राज्य किंवा केंद्र सरकारनेही दिलेले नाहीत, अशी स्पष्टोक्ती इंडियन आॅइलचे अध्यक्ष संजीव सिंह यांनी दिली.ते म्हणाले की, कोणताही प्रकल्प एका जागेहून दुसऱ्या ठिकाणी हलविण्याबाबत एकतर्फी निर्णय घेता येत नाही. या प्रक्रियेत राज्य सरकारची भूमिका महत्त्वाची असते. नाणार येथेच प्रकल्प सुरू करण्यात यावा यासाठी महाराष्ट्र सरकार आग्रही आहे. या प्रकल्पात परकीय गुंतवणूक झाली असून अशा वेळी तो अन्यत्र हलविला जाणे शक्य नाही. राज्य सरकार किंवा पेट्रोलियम मंत्रालयाने दुसरी जागा सुचविल्यास तो तिथे हलविला जाईल का यावर ते म्हणाले की, ते माझ्या अख्यत्यारीत नाही.भावनेच्या आहारी जाऊन निर्णय नाहीहा प्रकल्प विदर्भामध्ये नेण्यात यावा या मागणीतील भावना सच्ची असू शकते. परंतु नाणारचा प्रकल्प हा जगातील सर्वात मोठा प्रकल्प आहे. त्यात ३.५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होईल. अशा प्रकल्पाबाबत भावनेच्या आहारी जाऊन निर्णय घेता येणार नाही. या प्रकल्पाबरोबरच या परिसरात अन्य कोणते उद्योग सुरू करता येतील याचाही विचार झाला आहे.

टॅग्स :Nanar Refineryनाणार तेल शुद्धिकरण प्रकल्पBJPभाजपा