शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
2
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
3
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
4
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
5
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
6
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
7
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
8
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
9
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
10
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
11
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
12
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
13
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
14
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
15
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
16
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
17
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
18
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
19
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
20
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!

गैरहजर सदस्यांमुळे व्यंकय्या नायडू संतप्त, खासदारांची घेतली 'शाळा'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2018 15:13 IST

सोमवारी संध्याकाळी हे विधेयक मंजूर करण्यात आल्यानंतर मंगळवारी राज्यसभेचे कामकाज सुरु होताच नायडू यांनी काल विधेयकाच्या मंजुरीवेळी केवळ 156 सदस्य उपस्थित होते असे सांगितले. 

नवी दिल्ली- केंद्रीय मागासवर्ग आयोगाला घटनात्मक दर्जा देण्याचे विधेयक राज्यसभेत काल मंजूर करण्यात आले. मात्र त्यावेळेस सभागृहात सदस्यांची संख्या अगदीच कमी होती असे निरीक्षण नोंदवत उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी सर्व खासदारांना सभागृहात उपस्थित राहाण्याच्या सूचना केल्या. सोमवारी संध्याकाळी हे विधेयक मंजूर करण्यात आल्यानंतर मंगळवारी राज्यसभेचे कामकाज सुरु होताच नायडू यांनी काल विधेयकाच्या मंजुरीवेळी केवळ 156 सदस्य उपस्थित होते असे सांगितले. घटनादुरुस्ती विधेयकाच्यावेळेस इतकी कमी उपस्थिती असल्याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला. राज्यसभेत सध्या 245 सदस्य आहेत. घटनादुरुस्ती विधेयक मांडताना बहुमता इतके म्हणजे अर्ध्याहून अधिक सदस्य उपस्थित राहाणे आवश्यक असते आणि त्याला मंजुरी मिळण्यासाठी दोन तृतियांश सदस्य उपस्थित राहाणे आवश्यक असते. 'काल आपण एक ऐतिहासिक विधेयक एकमताने मंजूर केले पण किती सदस्य उपस्थि होते?'असा प्रश्न नायडू यांनी विचारुन , 156 असा आकडा सांगितला.

''एकमत होते म्हणून आपण कसेबसे हे विधेयक पास करु शकलो. थोडी जरी सदस्यसंख्या कमी असती तर विधेयक पडले असते''. अशा शब्दांमध्ये नायडू यांनी आपली नाराजी व्यक्त केली. ''अशा महत्त्वांच्या विधेयकांवेळी राजकीय पक्षांच्या नेत्यांना व्हीप काढता आले असते. महत्त्वाचे विधेयक सभागृहात आले असताना सदस्यांनी मोठ्या संख्येने सभागृहात उपस्थित राहाणं आवश्यक आहे, त्यामुळेच समाजात चांगला संदेश जाईल'' असेही नायडू यांनी सर्वांना सांगितले.अनेक सदस्य सभागृहात वेळेवर येत नाहीत. राज्यसभेचे कामकाज सकाळी 11 वाजता सुरु होते. याबद्दल बोलताना नायडू म्हणाले, ''सभागृहाचे कामकाज सुरु झाल्यावर, अध्यक्ष सभागृहात आल्यावर अनेक सदस्य येत असतात, अशांनी कामकाज सुरु होण्यापूर्वी येऊन बसणं आवश्यक आहे'' अशा शब्दांमध्ये त्यांनी लेटलतिफ खासदारांना कानपिचक्या दिल्या.

टॅग्स :Venkaiah Naiduव्यंकय्या नायडूRajya Sabhaराज्यसभाParliamentसंसदMember of parliamentखासदार