शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

Nagrota Encounter : मसूद अझरचा भाऊ दहशतवाद्यांना सूचना देत होता, पुराव्यांवरून धक्कादायक खुलासा

By ravalnath.patil | Updated: November 21, 2020 11:04 IST

Nagrota Encounter : चकमकीत ठार झालेले दहशतवादी पाकिस्तानहून पाठविण्यात आले होते व तेथून त्यांना सूचनाही देण्यात आल्या असल्याचा आता पुरावा आता तपास यंत्रणांना मिळाला आहे.

ठळक मुद्देचकमकीत ठार झालेल्या दहशतवाद्यांकडून 11 एके 47 रायफल्स, 29 हँड ग्रेनेड आणि तीन पिस्तूल जप्त करण्यात आल्या आहेत.

नगरोटा : जम्मू-काश्मीरच्या नगरोटामध्ये झालेल्या चकमकीत जैश-ए-मोहम्मदच्या 4 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. हे दहशतवादी पाकिस्तानचे होते. गुप्तचर यंत्रणांच्या माहितीनुसार, हे सर्व दहशतवादी जिल्हा विकास परिषद (डीडीसी) निवडणुकीवेळी मोठा हल्ला करण्याच्या उद्देशाने पाठविण्यात आले होते. तसेच, हे दहशतवादी पाकिस्तानमधील जैशचा प्रमुख मसूद अझरचा भाऊ रऊफ लाला याच्यासोबत सतत संपर्क साधत होते. ज्यावेळी या दहशतवाद्यांचा चकमकीत खात्मा करण्यात आला, त्यावेळी रऊफ लाला या सर्व दहशतवाद्यांना सूचना देत होता, असे तपास यंत्रणांनी सांगितले.

चकमकीत ठार झालेले दहशतवादी पाकिस्तानहून पाठविण्यात आले होते व तेथून त्यांना सूचनाही देण्यात आल्या असल्याचा आता पुरावा आता तपास यंत्रणांना मिळाला आहे. दहशतवाद्यांकडून पाकिस्तानच्या एका कंपनीचा डिजिटल मोबाइल रेडिओ (डीएमआर) तपास यंत्रणेला सापडला आहे. इतकेच नाही तर दहशतवाद्यांकडे सापडलेल्या मोबाइलवरील मेसेजेस पाहिल्यानंतर हेही स्पष्ट झाले की, दहशतवादी पाकिस्तानात बसलेल्या मार्गदर्शकांच्या सतत संपर्कात होते. हे संदेश पाकिस्तानच्या शकरगडहून पाठविण्यात आल्याची तपास यंत्रणेला शंका आहे.

गुप्तचर यंत्रणांच्या माहितीनुसार, डिजिटल मोबाइल रेडिओ पाकिस्तानस्थित मायक्रो इलेक्ट्रॉनिक्स कंपनी तयार करते. दहशतवाद्यांच्या मोबाइलवरील मेसेज पाहिल्यानंतर हे स्पष्ट झाले की, पाकिस्तान पुन्हा एकदा भारतात मोठा दहशतवादी हल्ला करण्याचा विचार करीत होता. यासह तपास यंत्रणांना सापडलेल्या दहशतवाद्यांचे शूज पाकिस्तानच्या कराचीमध्ये तयार करण्यात आले आहेत. यासह वायरलेस सेट व एक जीपीएस डिव्हाइसही जप्त करण्यात आला आहे, ज्यांच्या तपासणीत ही सर्व उपकरणे पाकिस्तानातून घेण्यात आल्याचे समोर आले आहे.

काही दिवसांपूर्वी शक्करगडमध्ये दिसला होता रऊफ लाला     सुत्रांच्या माहितीनुसार, रऊफ लाला काही दिवसांपूर्वी जम्मूमधील सांबा येथे आणि पाकिस्तानच्या शक्करगडमधील हिरानगर सेक्टरमध्ये दिसला होता. 31 जानेवारीला सुद्धा रऊफ लाला याने अशाचप्रकारे दहशतवाद्यांना घुसखोरी करण्याचा कट रचला होता, परंतु सुरक्षा दलाने या दहशतवाद्यांना बन टोल प्लाझाजवळ घेरले आणि त्यांचा खात्मा केला होता.

दहशतवाद्यांकडून 11 एके 47 रायफल जप्तचकमकीत ठार झालेल्या दहशतवाद्यांकडून 11 एके 47 रायफल्स, 29 हँड ग्रेनेड आणि तीन पिस्तूल जप्त करण्यात आल्या आहेत. याखेरीज आणखी काही वस्तूही सापडल्या आहेत.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरTerror Attackदहशतवादी हल्लाterroristदहशतवादी