शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

Nagpur: नागपुरातील ४८ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या, निवडणूकांच्या तोंडावर निर्णय, त्वरित बदलीच्या ठिकाणी रुजू होण्याचे निर्देश

By योगेश पांडे | Updated: January 31, 2024 05:26 IST

Nagpur: पुढील महिन्यात कधीही लोकसभा निवडणूकांची आचारसंहिता जाहीर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राज्य पोलीस दलात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. राज्यातील १३० पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यात नागपुरातील ४८ पोलीस निरीक्षकांचा समावेश आहे.

- योगेश पांडे नागपूर - पुढील महिन्यात कधीही लोकसभा निवडणूकांची आचारसंहिता जाहीर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राज्य पोलीस दलात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. राज्यातील १३० पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यात नागपुरातील ४८ पोलीस निरीक्षकांचा समावेश आहे. ३० जून २०२४ पर्यंत तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणाऱ्या निरीक्षकांचा या यादीत समावेश आहे. यामुळे अनेक पोलीस ठाण्यातील ठाणेदारांची जागा रिक्त होणार आहे.

यासंदर्भात विशेष पोलीस महानिरीक्षक (आस्थापना) के.एम.मल्लिकार्जून प्रसन्ना यांनी निर्देश जारी केले आहेत. या यादीत सर्वाधिक नागपुरातील पोलीस निरीक्षकांचाच समावेश आहे. या सर्व पोलीस निरीक्षकांना त्वरित कार्यमुक्त करून बदलीच्या ठिकाणी रुजू होण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ज्या जागा रिक्त होतील तेथे उपलब्ध पोलीस निरीक्षकांना जबाबदारी देण्याचे आदेश पोलीस आयुक्तांना देण्यात आले आहे. लोकसभा निवडणूका मुक्त व स्वच्छ वातावरणात पार पडाव्या यासाठी निवडणूक आयोगाने दिलेल्या मार्गदर्शक सूचना व निर्देशांनुसार या बदल्या करण्यात आल्या आहेत. याची माहिती केंद्रीय निवडणूक आयोगालादेखील पाठविण्यात आली आहे.

गृहमंत्र्याच्या जिल्ह्यातून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या प्रदेशातनागपूर शहरातून ३२ पोलीस निरीक्षकांची बदली ही ठाणे किंवा पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात झाली आहे. पिंपरी चिंचवडला सर्वाधिक १९ तर ठाण्यात १२ निरीक्षकांना पाठविण्यात आले आहे. तर आठ जणांची अमरावतीला बदली झाली आहे. गृहमंत्र्यांच्या जिल्ह्यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री पवार यांच्या प्रदेशात निरीक्षकांची बदली झाल्याची पोलीस विभागात चर्चा आहे.

काही पोलीस निरीक्षकांना अकार्यक्षमता भोवलीया यादीतील काही पोलीस निरीक्षक विविध वादात सापडले होते. त्यांना त्यांची अकार्यक्षमतादेखील भोवल्याचे सांगण्यात येत आहे. यातील काही पोलीस निरीक्षक ठाणेदार होते. मात्र विविध वादांमुळे त्यांना तेथून हटविण्यात आले होते.

शहराला मिळाले ४७ नवीन निरीक्षकदरम्यान, शहराला ४७ नवीन पोलीस निरीक्षक राज्याच्या विविध भागांतून मिळाले आहेत. त्यात विकास धस, दीप बाणे, ज्ञानेश्वर आव्हाड, गिताराम शेवाळे, विनोद काळेकर, संतोष गायकर,अरुण क्षीरसागर, सुधाकर हुंबे, अरुण गरड, सचिन गावडे, किरणकुमार कबडी, स्मिता जाधव, राजू चव्हाण, राजेश तटकरे, विनायक वेताळ,सोन्याबापू देशमुख, युनूस मुलानी, अरविंद पवार, रुपाली बोबडे,किशोर पाटील, प्रकाश जाधव, बाळकृष्ण सावंत,मच्छिंद्र पंडित, विश्वजीत खुळे, रामचंद्र घाडगे, सुनिल पिंजन, प्रसाद गोकुळे, दिपाली धडगे, रणजीत सावंत, शैलेश गायकवाड, सुनिल गोडसे, पोपट धायतोंडे, सुरेश वासेकर, अश्विनी भोसले, प्रशांत पोतदार, अशोक भंडारे, कैलास देशमाने, संतोष पाटील, राजश्री आडे, विजय दिघे, प्रवीण काळे, विवेकानंद राऊत, नितीन मगर, आसाराम चोरमाळे, राहुल आठवले, अनिल कुरलकर, मनिष ठाकरे यांचा समावेश आहे.

हे आहेत बदली झालेले निरीक्षक

बदलीचे ठिकाणी : निरीक्षकअमरावती : भानुप्रताप मडावी , प्रशांत माने, मनिष बन्सोड, मनोहर कोटनाके, हरीदास मडावी, हनमंत उर्लगोंडावार, नंदा मंगाते, कविता इसारकरठाणे : अशोक कोळी, राजेश पुकाळे, मुकुंद साळुंके, अरविंद भोळे, सुनिल चौहान, जग्वेंद्रसिंह राजपूत, बळीरामसिंह परदेशी, संजय जाधव, विनोद पाटील, शिल्पा पवार, रविंद्र पवार, विजय नाईकपिंपरी चिंचवड : वैजयंती मांडवधरे, विश्वनाथ चव्हाण, विनोद चौधरी, बापू ढेरे, दीपक गोसावी, प्रवीण कांबळे, प्रदीप रायनवार, अमित डोळस, संग्राम शेवाळे, अमोल देशमुख, राजेंद्रकुमार सानप, गणेश जामदार, नितीन फटांगरे, बबन येडगे, भारत शिंदे, ऋषिकेश घाडगे, भीमा नरके, भारत कऱ्हाडे, गोरख कुंभारगडचिरोली : अनिरुद्ध पुरी, विशाल काळे, रविंद्र नाईकवाड, विनोद रहांगडाले, विश्वाल पुल्लरवारछत्रपती संभाजीनगर : शुभांगी देशमुख, कृष्णचंद्र शिंदेगोंदिया : मंगेश काळेगोंदिया : रवी नागोसे

टॅग्स :PoliceपोलिसTransferबदलीnagpurनागपूर