शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

गोध्र्यात ओवेसींचं नाणं खण-खणलं; 8 जागांवर लढली निवडणूक, 7 जागा जिंकल्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 02, 2021 8:57 PM

AIMIM : आतापर्यंत आलेल्या निकालानुसार, ओवेसींच्या एआयएमआयएमने मोडासा येथे 12 पैकी 8, गोध्रा येथे 8 पैकी 7 तर भरूच येथे 8 पैकी 1 जागांवर विजय मिळवला आहे.

गोध्रा -गुजरातमधील नगरपालिका, जिल्हा परिषदा आणि पंचायत समितींसाठी झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला (भाजप) मोठे यश मिळाले आहे. तर काँग्रेसची कामगिरी येथेही अत्यंत वाईट झाली. मात्र, यातच ओवेसींच्या एआयएमआयएम पक्षाने गोध्रा येथे 8 जागांवर आपले उमेदवार उभे केले होते. त्यांपैकी 7 उमेदवार निवडून आले आहेत. काँग्रेसचा यापूर्वीही नगरपालिका निवडणुकीत वाईट प्रकारे पराभव झाला होता. (Asaduddin owaisi's party AIMIM Win on the 7 sits in Godhra)

या निवडणुकांमध्ये एकूण 8,235 जागांसाठी भाजपने 8,161 उमेदवार, काँग्रेसने 7,778, आम आदमी पार्टी (आप)ने 2,090 उमेदवार मैदानात उतरवले होते. याशिवाय असदुद्दीन ओवैसी यांनीही या निवडणुकीत आपले उमेदवार उभे केले होते. आतापर्यंत आलेल्या निकालानुसार, ओवेसींच्या एआयएमआयएमने मोडासा येथे 12 पैकी 8, गोध्रा येथे 8 पैकी 7 तर भरूच येथे 8 पैकी 1 जागांवर विजय मिळवला आहे.

नगरपालिका, जिल्हापरिषद अन् पंचायत समितीच्या निकालांवर काय म्हणाले मोदी -गुजरातच्या ग्रामीण भागाने सर्वसंमतीने विकासावर शिक्कामोर्तब केले आहे. सरकारच्या जनहितार्थ कामाने लोकांच्या मनात घर केले आहे. तर दुसरीकडे भाजपा कार्यकर्त्यांनी घेतलेल्या मेहनतीचे हे फळ आहे. आमचा पक्ष गुजरातमधील सर्व बंधू-भगिनींच्या प्रगतीसाठी काम करत राहिल. 

तसेच, गुजरातमधील नगरपालिका, तालुका पंचायत आणि जिल्हा परिषदांच्या निकालाने आपला स्पष्ट संदेश दिला आहे. संपूर्ण राज्य विकास, सुशासन आणि जनकल्याणाच्या अजेंड्यासोबत मजबुतीने उभे आहे. मी भाजपावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल गुजरातच्या जनतेला नमन करतो, असे मोदी यांनी ट्विट करून म्हटले आहे.  

टॅग्स :AIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनAsaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीGujaratगुजरातElectionनिवडणूक