शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

जयललितांच्या मृत्यूचे रहस्य वाढले, समोर आला रुग्णालयातील पहिला व्हिडिओ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2017 14:35 IST

तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांच्या मृत्यमागील संशयाचे धुके अद्यापही विरलेले नाही. जयललितांचा मृत्यू नेमका झाला? या प्रश्नाचे उत्तर मिळण्याऐवजी त्यांच्या मृत्युमागील रहस्य दिवसेंदिवस अधिकच गुढ होत चालले आहे.

चेन्नई - तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांच्या मृत्यमागील संशयाचे धुके अद्यापही विरलेले नाही. जयललितांचा मृत्यू नेमका झाला? या प्रश्नाचे उत्तर मिळण्याऐवजी त्यांच्या मृत्युमागील रहस्य दिवसेंदिवस अधिकच गुढ होत चालले आहे. दरम्यान, बुधवारी जयललिता यांचा रुग्णालयात दाखल करण्यात आलेला एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये जयललिता रुग्णालयातील बेडवर बसलेल्या आहेत. तसेच ज्युससारखे पेय पीत त्या टीव्ही पाहताना दिसत आहेत. मात्र हा व्हिडिओ नेमका कधीचा आहे, हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. हा व्हिडिओ टीटीव्ही दिनकरन यांच्या गटातील आमदाराने प्रसारित केला आहे. गतवर्षी गंभीर आजारपणानंतर 74 दिवस रुग्णालयात उपचार घेत असलेल्या जयललितांचे 5 डिसेंबर 2016 रोजी निधन झाले होते. अपोलो रुग्णालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा दावा खोटातामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जे. जयललिता यांना गेल्या वर्षी 22 सप्टेंबर रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यावेळी त्यांचा श्वास सुरू नव्हता, असे अपोलो रुग्णालयातील वरिष्ठ अधिकाऱ्याने काही दिवसांपूर्वी सांगितले होते. तसेच उपचारांदरम्यान जयललितांसोबत तेच लोक होते. ज्यांच्या नावांना त्यांनी पसंती दिली होती, असा दावाही त्यांनी केला होता. मात्र अपोलो रुग्णालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केलेले हे दोन्ही दावे खोटे असल्याचे सिद्ध झाले आहेत. अगतिक झाल्याने प्रसारित केला व्हिडिओ जयललिता यांचा हा व्हिडिओ प्रसारित करणाऱ्या पी. वेत्रिवेल यांनी सांगितले की, रुग्णालयात जयललिता यांना रुग्णालयात कुणाला भेटू दिले गेले नाही ही बाब चुकीची आहे. आम्ही व्हिडिओ प्रसारिक करू इच्छित नव्हतो. पण आमच्यासमोर काहीही पर्याय नव्हता. तसेच जयललितांच्या मृत्यूची चौकशी करत असलेल्या चौकशी आयोगानेही आम्हाला आद्याप बोलावलेले नाही. जर आयोगाने बोलावले तर आम्ही त्यांच्यासमोर पुरावे सादर करू.व्हिडिओचे आर.के.नगर पोटनिवडणुकीशी कनेक्शनएआयएडीएमकेचे नेते असलेले टीटीव्ही दिनकरन आर.के. नगर मतदार संघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत. त्यांनी सांगितले की, अपोलो रुग्णालयात जयललितांवर उपचार सुरू होते याचा हा व्हिडिओ पुरावा आहे. मात्र  हा व्हिडिओ प्रसारित करण्यामागे आ.के. नगर विधानसभा पोटनिवडणुकीचे कोणतेही कनेक्शन नसल्याचे वेत्रिवेल यांनी सांगितले आहे. 

टॅग्स :Tamilnaduतामिळनाडूhospitalहॉस्पिटल