शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

आंध्र प्रदेशमध्ये पसरतोय रहस्यमय आजार, एका रात्रीत सापडले १४० रुग्ण

By बाळकृष्ण परब | Updated: December 7, 2020 22:59 IST

Andhra Pradesh News : देशात कोरोनाच्या फैलावाचे सत्र सुरू असतानाच आता आंध्र प्रदेशमधील एलरू शहरात एक रहस्यमय आजार पसरत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

ठळक मुद्देगेल्या शनिवारी एलुरू शहरात चक्कर आणि मळमळ या लक्षणांनंतर मुलांसह एकूण १८ जण बेशुद्ध झाले होते वन-टाऊन क्षेत्रात अचानक घडलेल्या या घटनेनंतर कुठलातरी रहस्यमय आजार पसरल्याची चर्चा स्थानिकांमध्ये सुरू झालीएलुरू शहरातील सर्व परिस्थिती सामान्य आहे तसेच घाबरण्यासारखे काही नाही, असे, उपमुख्यमंत्री श्रीनिवास यांनी रविवारी सांगितले

अमरावती (आंध्र प्रदेश) - देशात कोरोनाच्या फैलावाचे सत्र सुरू असतानाच आता आंध्र प्रदेशमधील एलरू शहरात एक रहस्यमय आजार पसरत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या रहस्यमय आजारामुळे लोक मोठ्या प्रमाणात बाधित होत असून, काल एका रात्रीत सुमारे १४० रुग्ण सापडले आहेत. दरम्यान, हा नेमका कोणता आजार आहे. याचा उलगडा डॉक्टरांनाही झालेला नाही.चिंताजनत बाब म्हणजे रुग्णांची संख्या वाढण्यामागचे कारण डॉक्टरांनाही कळलेले नाही. गेल्या शनिवारी एलुरू शहरात चक्कर आणि मळमळ या लक्षणांनंतर मुलांसह एकूण १८ जण बेशुद्ध झाले होते. मात्र आजारी पडल्यानंतर काही क्षणा्ंतच ते बरे झाले होते. वन-टाऊन क्षेत्रात अचानक घडलेल्या या घटनेनंतर कुठलातरी रहस्यमय आजार पसरल्याची चर्चा स्थानिकांमध्ये सुरू झाली होती.

दरम्यान, या प्रकारानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री (आरोग्य) एकेके श्रीनिवास यांनी याबाबत माहिती दिली आहे. एलुरू शहरातील सर्व परिस्थिती सामान्य आहे तसेच घाबरण्यासारखे काही नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. काही जणांच्या रक्ताचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत, असे त्यांनी सांगितले. संबंधित रुग्णांचे सिटीस्कॅन करण्यात आले असून, त्यामध्ये सर्व काही सामान्य असल्याचे दिसून आल्याचे पश्चिम गोदावरी जिल्ह्याचे संयुक्त जिल्हाधिकारी हिमांशू शुक्ला यांनी सांगितले. तसेच हा प्रकार विषाणूजन्य संसर्गाचा असू शकतो, अशी शक्यताही त्यांनी वर्तवली. या आजाराबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री श्रीनिवास यांनी रविवारी सांगितले की, पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील एलुरू शहरात स्थानिक सरकारी रुग्णालयांमध्ये चक्कर आणि मिर्गी येत असल्याची तक्रार केल्यानंतर काही रुग्णांना भरती करण्यात आले होते. मात्र आता तेथील परिस्थितीत नियंत्रणात आहे. रुग्णांना वैद्यकीय मदत पुरवण्यात आली असून, आता सर्वजण सुरक्षित आहेत.

टॅग्स :Andhra Pradeshआंध्र प्रदेशHealthआरोग्य