शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

फक्त 51 रुपयात खरेदी करा भारी ब्रॅण्डेड कपडे, मिंत्राचा नवा मार्केटिंग मंत्रा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2018 10:25 IST

या ऑनलाइन शॉपिंग पोर्टलने भारतातील पहिली कपड्यांची ईएमआयवर विक्री सुरू केली आहे. 

मुंबई- सध्या कुठलीही वस्तू खरेदी करणं अगदी सोपं झालं आहे. महाग वस्तू ईएमआयवर घेण्याकडे ग्राहकांचा जास्त कल असतो. दुकानांबरोबरच सध्या सुरू असलेल्या ऑनलाइन शॉपिंग पोर्टलवरूनही वस्तू ईएमआयवर घेणं शक्य झालं आहे. इलेक्ट्रॉनिक्स, मोबाइल यांसारख्या वस्तून ईएमआयवर घेतो. पण आता कपडेही ग्राहकांना ईएमआयवर घेता येणार आहेत. मिंत्रा या ऑनलाइन शॉपिंग पोर्टलने भारतातील पहिली कपड्यांची ईएमआयवर विक्री सुरू केली आहे. 

मिंत्रा या शॉपिंग ऑनलाइन शॉपिंग वेबसाइटवरून ग्राहकांना ईएमआयवर कपडे विकत घेता येतील. यासाठी दरमहिन्याला 51 रूपयांचा ईएमआय भरावा लागेल. 3 ते 24 महिने असा ईएमआयचा कालावधी असेल. ज्या प्रमाणे आपण एखादी महागडी वस्तू खरेदी केल्यावर योग्य महिन्याचा प्लॅन निवडून ईएमआय भरतो तोच नियम कपडे खरेदीच्या बाबतीतही लागू होतो आहे. 

मिंत्राची ईएमआय पॉलिसी नेमकी कशी ?क्रेडिट कार्ड वापरून महाग वस्तू खरेदी केल्यावर ज्याप्रकारे इन्स्टॉलमेंट विभागून मिळतात. तसंच या पॉलिसीमध्येही असेल. 1300 किंवा त्यापेक्षी कमी किंमतीची वस्तू मिंत्रावरून खरेदी केल्यानंतर ही ईएमआय पॉलिसी घेता येईल. त्यामुळे मिंत्रावरून कपडे, दागिने किंवा इतर वस्तू खरेदी करून तुम्हाला नंतर ईएमआय स्वरूपात पैसे भरता येतील. वेगळे व महागडे ब्रॅण्ड ज्यांना वापरायचे आहेत अशांचा याचा फायदा होणार आहे. 

कसं काम करेल मिंत्रा ईएमआय ?मिंत्राने एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, सिटी बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, कोटक महिंद्रा बँक, अॅमेक्स, एचएसबीसी यांसारख्या बँकाबरोबर मिंत्राची पार्टनरशीप आहे. याच बँका ईएमआय पॉलिसीमध्ये मदत करतील. या बँका खरेदीवर 13 ते 15 टक्के इंटरेस्ट आकारतील.