शहरं
Join us  
Trending Stories
1
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
4
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
5
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
6
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
7
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
8
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
9
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
10
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
11
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
12
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
13
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
15
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
16
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
17
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
18
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
19
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
20
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 

म्यानमार बॉर्डर सील; आता घुसखोरी थांबणार, गृहमंत्रालयाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2024 09:57 IST

लोकांचा मुक्त वावर रोखण्यासाठी गृहमंत्रालयाचा निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : भारत व म्यानमार या उभय देशांदरम्यान मुक्त वावरासाठी घेतलेला फ्री मूव्हमेंट रेजिमचा (एफएमआर) निर्णय रद्द करण्याची महत्त्वपूर्ण घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गुरुवारी केली. यामुळे दोन्ही देशांच्या सीमेवरील लोकांचा मुक्त वावर बंद झाला आहे. भारताची अंतर्गत सुरक्षा व म्यानमारला लागून असलेल्या ईशान्येच्या राज्यांची लोकसंख्याविषयक संरचना कायम राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे शाह यांनी सांगितले.

गृहमंत्री म्हणाले की, एफएमआर तत्काळ रद्द करण्यात यावा, अशी शिफारस केंद्रीय गृह मंत्रालयाने केली होती. त्यानुसार परराष्ट्र खात्याने पुढील प्रक्रिया सुरू केली. भारत-म्यानमार सीमेजवळ राहणाऱ्या लोकांना कोणत्याही कागदपत्रांशिवाय एकमेकांच्या प्रदेशात १६ किमी अंतरापर्यंत जाण्याची परवानगी एफएमआरमुळे देण्यात आली होती. देशाच्या सीमा सुरक्षित असाव्यात, यासाठी पंतप्रधान दक्ष आहेत. त्याच भूमिकेतून एफएमआरबाबत निर्णय घेण्यात आला आहे.

सीमेवर संपूर्ण भागात कुंपण भारत व म्यानमार या दोन देशांमधील सीमेवर संपूर्ण भागात कुंपण उभारण्याचा निर्णय केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मंगळवारी जाहीर केला होता.तसेच या सीमेवर गस्त घालण्याकरिता व टेहळणीसाठी कुंपणालगत एक रस्ताही बांधण्याचा विचार आहे. दोन देशांच्या सीमेलगत अरुणाचल प्रदेश, मणिपूरमधील एक किमी परिसरात कुंपण घालण्याचे काम सुरू झाले आहे.

बॉर्डर सीलचा निर्णय का? म्यानमारमध्ये बंडखोर गट व लष्कर यांच्यातील संघर्ष तीव्र होत आहे.  नोव्हेंबरपासून आतापर्यंत ६०० सैनिक भारतात घुसले होते. मिझोराम सरकारने यासंदर्भात केंद्राकडे मदत मागितली होती. जानेवारीमध्ये म्यानमारमधून पळून आलेल्या सैनिकांनी मिझोराममध्ये आश्रय घेतला होता.

काय आहे एफएमआर? nभारत आणि म्यानमारमध्ये १६०० किमी लांबीची सीमा आहे. १९७० मध्ये दोन्ही देशांमध्ये मुक्त हालचालीबाबत करार झाला होता.nयाला फ्री मूव्हमेंट रेजिम म्हणजेच ‘एफएमआर’ असे म्हणतात. त्याचे शेवटचे २०१६ मध्ये नूतनीकरण करण्यात आले.nयामुळे दोन्ही देशांतील लोकांना कोणत्याही कागदपत्रांशिवाय एकमेकांच्या प्रदेशाला भेट देता येत होती.

तक्रार काय? nम्यानमारमधील दहशतवादी सीमा ओलांडून भारताच्या हद्दीत येतात, अशी तक्रार मणिपूरमधील मैतेई जमातीने केली होती.nदेशांच्या सीमेवर कुंपण नसल्याचा फायदा घेऊन हे दहशतवादी भारतात अमली पदार्थांची तस्करी करतात, असाही दावा करण्यात आला होता.

टॅग्स :Amit Shahअमित शाहMyanmarम्यानमारHome Ministryगृह मंत्रालय