शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

माझा पुढचा जन्म 'या' राज्यातच व्हावा, अशी माझी इच्छा आहे; धीरेंद्र शास्त्री यांचं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2024 19:20 IST

धीरेंद्र शास्त्री हे त्यांच्या विधानांमुळे नेहमीच चर्चेत असतात.

बागेश्वर धामचे मठाधिपती धीरेंद्र शास्त्री हे त्यांच्या विधानांमुळे नेहमी चर्चेत असतात. आता धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत बिहारबद्दलचे त्यांचे नितांत प्रेम व्यक्त केले. आपल्या आत्म्यात बिहार वसतो आणि आपला पुढचा जन्म बिहारमध्येच व्हावा अशी आपली इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय त्यांनी बिहारचे वर्णन 'मोक्ष आणि ज्ञानाची भूमी' असे केले. धार्मिक विधीसाठी ते सध्या २०० अनुयांसह बिहारमधील गया येथे आहेत. बिहार हे एक अद्भुत राज्य असून, बिहारची खूप आवड आहे. माझा पुढचा जन्म बिहारमध्येच व्हावा अशी माझी इच्छा आहे. माझा आत्मा बिहार असून, बिहार ही मोक्षभूमी आणि ज्ञानभूमी आहे, असे धीरेंद्र शास्त्री यांनी नमूद केले.

दरम्यान, यावेळी धीरेंद्र शास्त्री यांनी दुसरे बागेश्वर म्हणून बिहारचा उल्लेख केला. बिहारचे माझ्यावर असलेले कर्ज फेडण्यासाठी मी वारंवार इथे येत राहणार असल्याचे त्यांनी म्हटले. धीरेंद्र शास्त्री पुढे म्हणाले की, काहीजण आमच्यावर कसलेही आरोप करतात. त्यांना मी सांगू इच्छितो की, मी काल होतो तसाच आज आहे आणि उद्या देखील असेन. काहीही टिप्पणी करणाऱ्यांनी प्रभू रामालाही सोडले नाही. प्रत्येकजण आपापल्या परिस्थितीनुसार बोलत असतो. ज्याचे काम होईल तो सत्कार करेल आणि ज्याचे काम होणार नाही ती मंडळी ढोंगी असे संबोधेल. 

टीकाकारांना प्रत्युत्तर तसेच आम्ही केवळ एका धार्मिक विधीसाठी गया येथे आलो आहोत. यामध्ये २०० अनुयायी सहभागी झाले आहेत. आम्ही इथे पिंडदान कार्यक्रमासाठी आलो आहोत. बागेश्वर धामशी संबंधित आलेल्यांना राहण्याची पावती मिळाली आहे. त्या पावतीच्या आधारे ते लोक येथे राहत आहेत. ते बागेश्वर धाम येथील कुटुंबीय आहेत. त्यामुळे त्यांना भेटणे ही माझी प्रमुख जबाबदारी आहे. पैसे घेऊन दरबार भरवला असे म्हणणारे लोक समजूतदार नाहीत असे मला वाटते, अशा शब्दांत धीरेंद्र शास्त्रींनी टीकाकारांचा समाचार घेतला. 

टॅग्स :bageshwar dhamबागेश्वर धामBiharबिहार