शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

करकरेंच्या मृत्यूच्या दिवशी माझे सुतक सुटले; भाजपच्या साध्वी प्रज्ञासिंह यांचे बेताल वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2019 06:48 IST

मी तुरुंगात गेले त्या दिवसापासून सुुरू झालेले सुतक मिटले, असे अत्यंत वादग्रस्त वक्तव्य मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी व भोपाळमधील भाजपच्या लोकसभा उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी केले आहे.

नवी दिल्ली/भोपाळ : मुंबई पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाचे माजी प्रमुख हेमंत करकरे यांच्या मृत्यूच्या दिवशी माझे ज्या दिवशी मी तुरुंगात गेले त्या दिवसापासून सुरू झालेले सुतक मिटले, असे अत्यंत वादग्रस्त वक्तव्य मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी व भोपाळमधील भाजपच्या लोकसभा उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी केले आहे.त्याचा सर्व स्तरांतून निषेध होत असून, विरोधी पक्षांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. या वक्तव्यामुळे देशात संतापाची लाट उसळली आहे. एका बॉम्बफोटातील आरोपीने दहशतवाद्याशी लढताना हुतात्मा झालेल्या पोलीस अधिकाऱ्याविषयी असे उद्गार काढणे अतिशय निंदनीय आहे, अशी प्रतिक्रिया सर्वत्र उमटत आहे.सोशल मीडियावरही प्रज्ञासिंह यांच्यावर या वक्तव्याबाबत टीका होत आहे. अशा महिलेला भाजपने निवडणुकीची उमेदवारी दिलीच कशी, असाही सवाल आता विचारला जाऊ लागला आहे आहे. या प्रकरणी पंतप्रधान मोदी यांनी माफी मागावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. माजी वरिष्ठ पोलिस अधिकारी जे. एफ. रिबेरो यांनीही या वक्तव्याचा निषेध केला आहे. भाजपने मात्र प्रज्ञा सिंह यांच्या वक्तव्याविषयी अतिशय सावध प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आम्ही हेमंत करकरे यांना हुतात्माच मानतो. प्रज्ञासिंह यांनी व्यक्त केलेले मत त्यांचे वैयक्तिक आहे. प्रज्ञा सिंह यांचा जो शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला, त्यामुळे त्यांनी हे वक्तव्य केले असावे, असे भाजपने म्हटले आहे.प्रज्ञा सिंह म्हणाल्या की, मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी माझ्याविरोधात काही पुरावा नसेल तर माझी सुटका करावी अशी विनंती मी हेमंत करकरे यांना केली होती. त्यावर पुरावे नसले तर शोधून काढू, पण तुमची सुटका करणार नाही, असे करकरे म्हणाले. तेव्हा मी त्यांना तुमचा सर्वनाश होईल असा शाप दिला होता. या बॉम्बस्फोट प्रकरणात करकरे यांनी मला विनाकारण गोवले आणि अतिशय वाईट वागणूक दिली. ज्या दिवशी मी तुरुंगात गेले त्या दिवशी माझे सुतक सुरू झाले आणि ज्या दिवशी दहशतवाद्यांनी हेमंत करकरे यांना मारण्यात आले, त्या दिवशी हे सुतक संपले. प्रभू रामचंद्राने एका संन्याशांच्या मदतीने रावणाचा अंत केला होता. २००८ सालीही तेच घडले.साध्वी प्रज्ञा सिंह यांच्या वक्तव्यातून पाकिस्तानी दहशतवाद्यांचे एका प्रकारे समर्थनच झाले आहे. त्यांनी करकरे यांची तुलना रावणाशी, तर पाकिस्तानी दहशतवाद्यांची तुलना थेट संन्याशाशी केली आहे. असे करताना त्यांनी स्वत: प्रभू रामचंद्र असल्याचेच भासवले आहे.मुंबईवर २००८ साली झालेल्या हल्ल्यात दहशतवाद्यांशी लढताना हेमंत करकरे व त्यांचे सहकारी अशोक कामटे व विजय साळस्कर शहीद झाले होते. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात साध्वी प्रज्ञासिंह प्रमुख आरोपी आहेत. आपण आजारी असून, स्तनांचा कर्करोग झाला आहे, कोणाच्याही आधाराशिवाय आपल्याला चालता येत नाही, अशी विनंती करून त्यांना जामिनासाठी अर्ज केला आणि त्याच कारणामुळे तो न्यायालयाने मंजूर केला. सुटल्यानंतर अलीकडेच त्यांनी बुधवारी भाजपमध्ये प्रवेश केला. भोपाळमध्ये काँग्रेस नेते दिग्विजयसिंह यांच्या विरोधात त्या लढत देत आहेत.याआधी २00८ च्या मध्य प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारातही भाजप नेत्यांनी मालेगाव बॉम्बस्फोटांत निरपराध हिंदुंना गोवले जात असल्याची भाषणे केली होती. तसेच हेमंत करकरे हे हिंंदुविरोधी असल्याचा आरोप तेव्हाच्या सभांमध्ये करण्यात आला होता.शिवराज सिंह चौहान यांनीही आपल्या भाषणात करकरे यांच्यावर टीका केली होती. मात्र मुंबई दहशतवादी हल्ल्यात हेमंत करकरे व अन्य पोलीस अधिकारी शहीद झाल्यानंतर भाजपने तो मुद्दा आणण्याचे टाळले होते.>इंद्रेश कुमार यांच्याकडून प्रज्ञासिंहचे समर्थननाशिक : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी शहीद हेमंत करकरे यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह विधानाचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राष्ट्रीय वक्ते इंद्रेश कुमार यांनी समर्थन केले आहे. त्यांच्यावर झालेल्या अत्याचाराविषयी त्यांनी सत्य परिस्थिती कथन केल्याचे मत इंद्रेश कुमार यांनी व्यक्त केले. निवडणूक आयोगाने त्यांचा अर्ज वैध ठरविला आहे. शिवाय सहा पैकी चार आरोपांतून त्यांची निर्दोष मुक्तता झाली असून, दोन आरोपांमध्ये त्या जामिनावर असल्याचे इंद्रेशकुमार यांनी सांगितले.

>संतापानंतर दिलगिरीआपल्या विधानाने संतापाची लाट उसळल्याचे पाहून व निवडणूक आयोगानेही वक्तव्याची गंभीर दखल घेत खुलासा मागितल्यानंतर साध्वी प्रज्ञासिंह यांनी दिलगिरीचा मार्ग स्वीकारला. हेमंत करकरे हे शहीदच आहेत, असे सांगतानाच, साध्वीने आपल्या वक्तव्याने देशाच्या शत्रूंचाच फायदा होत असल्याने आपण विधान मागे घेत आहोत आणि दिलगिरी व्यक्त करीत आहोत, असे सांगून टाकले. मात्र ही पश्चातबुद्धी असून, त्यांच्या मनात काय आहे, ते त्यांनी आधीच बोलून दाखवले आहे, अशी टीका काँग्रेस व अन्य विरोधकांनी केली.>सर्वच विरोधकांचा हल्लाबोलयाप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागावी. प्रज्ञा सिंहना उमेदवारी देऊ न आपण देशद्रोही असल्याचे भाजपने सिद्ध केले आहे.- रणदीप सुरेजवाला, काँग्रेसचे प्रवक्तेअशा प्रकारचे वक्तव्य करुन हेमंत करकरे यांचा अवमान करण्याचे हिंमत भाजपला होतेच कशी?- असदुद्दीन ओवेसी, प्रमुख, एमआयएमहेमंत करकरे यांच्याविषयी प्रज्ञासिंह यांच्या वक्तव्यामुळे भाजपचे खरे रुप जगासमोर आले आहे.- अरविंद केजरीवाल, प्रमुख, आपजे देशासाठी शहीद झाले त्यांच्यावर कोणीही टिप्पणी करू नये. करकरे हे इमानदार आणि कर्तव्यनिष्ठ अधिकारी होते. त्यांच्याबाबत आम्हा सगळ््यांना गर्वच वाटतो. - दिग्विजय सिंह, काँग्रेस नेतेबॉम्बस्फोटातील आरोपीला उमेदवारी देणारा भाजप देशद्रोही असून जनतेने त्याला कोपऱ्यात ढकलले पाहिजे.- माकपकरकरे यांच्याविषयी अतिशय घाणेरडे उद्गार काढणाºया प्रज्ञासिंगवर भाजप कारवाई करणार का?- मेहबुबा मुफ्ती, अध्यक्ष, पीडीपीशहीद होणाºया वर्दीतील प्रत्येकाविषयी सर्वांनी आदरानेच बोलावे. आम्ही प्रज्ञा सिंह यांच्या वक्तव्याचा निषेध करीत आहोत.- वरिष्ठ पोलीस अधिकारी असो.>हा शहिदांचा अपमानमहाराष्टÑ एटीएसचे प्रमुख दिवंगत हेमंत करकरे यांच्याबाबतचे साध्वी प्रज्ञा सिंह यांचे विधान हे शहिदांचा अपमान करणारे, दु:खदायक आहे. ज्यांनी आपल्या मायभूमीसाठी सर्वाेच्च त्याग केला, त्यांच्याबाबत केलेले हे वक्तव्य आक्षेपार्ह आहे. या विचारसरणीचा मी निषेध करतो. संबंधित पक्षाच्या नेतृत्वाने या अपमानकारक वक्तव्याची दखल घेऊन योग्य कारवाई करावी.-विजय दर्डा, चेअरमन, लोकमत एडिटोरिअल बोर्ड

टॅग्स :Sadhvi Pragya Singh Thakurसाध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर