शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

माझ्यावरील आरोप बिनबुडाचे, कायदेशीर कारवाई करणार- एम. जे. अकबर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2018 16:33 IST

भाजपा नेते आणि माजी परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर यांनी लैंगिक शोषणाच्या आरोपांवर स्पष्टीकरण दिलं आहे.

नवी दिल्ली- भाजपा नेते आणि माजी परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर यांनी लैंगिक शोषणाच्या आरोपांवर स्पष्टीकरण दिलं आहे. एम. जे. अकबर म्हणाले, कोणतीही साक्ष नसताना आरोप करणं हे आता व्हायरल तापासारखं झालं आहे. माझ्यावर करण्यात आलेले आरोप हे बिनबुडाचे आहेत. माझ्यावर आरोप करणा-या व्यक्तींविरोधात मी कायदेशीर कारवाई करणार आहे.काही वेळापूर्वीच त्यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. केंद्रीय मंत्री एम. जे. अकबर यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. #MeToo मोहिमेदरम्यान आरोप झालेले केंद्रीय मंत्री एम. जे. अकबर आज भारतात परतले आहे. विमानतळावरच पत्रकारांनी त्यांना गाठले. त्यावेळी आपल्यावर झालेल्या आरोपांबाबत नंतर बोलणार असल्याचे त्यांनी सांगितले.मात्र, राजीनामा देणार का, असे विचारले असता त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. पण अकबर यांनी राजीनामा दिल्याचे समजते. त्यांनी पंतप्रधान कार्यालयाकडे ई-मेलद्वारे आपला राजीनामा दिला असून, पंतप्रधानांच्या सचिवांनी त्यांच्या राजीनाम्याची नोंद केल्याचीही माहिती आहे. काय आहे प्रकरण ?एम. जे. अकबर यांच्याविरोधात पहिली तक्रार प्रिया रमणी यांनी केली होती. त्यानंतर गझला वहाब, साबा नकवी, शुतापा पॉल, शुमा राहा, सुपर्णा शर्मा व प्रेरणा सिंग बिंद्रा यांनीही अकबर यांच्याविरोधात लैंगिक शोषणाच्या तक्रारी केल्या. या सर्व महिला पत्रकारांनी अकबर यांच्या हाताखाली कधी ना कधी काम केले आहे. पुरुष आपल्या पदाचा अनेकदा गैरवापर करताना आढळतात. चित्रपटसृष्टीप्रमाणे माध्यमे, राजकारण आणि कंपन्यांतील वरिष्ठ अधिकारी असे करत असतात. आता महिला उघडपणे बोलू लागल्या असून, त्यांचे म्हणणे गांभीर्याने घ्यायलाच हवे, असंही केंद्रीय मंत्री मनेका गांधी म्हणाल्या आहेत. 

टॅग्स :M J Akbarएम. जे. अकबरMetoo Campaignमीटू