शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

'भारतातील मुसलमानांचा मुघलांशी संबंध नाही, पण त्यांच्या बायका कोण होत्या?' ओवेसींचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2022 09:46 IST

ओवेसी यांनी यापूर्वी, पुष्यमित्राने तोडलेल्या बौद्ध मंदिरांसंदर्भात भाजप का भाष्य करत नाही, असा सवालही उपस्थित केला होता.

सध्या वाराणसीच्या ज्ञानवापी मशिदीवरून वाद सुरू आहे. यासंदर्भात, ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे (एआयएमआयएम) अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी ज्ञानवापीचा संबंध औरंगजेबाशी जोडण्यावरून नाराजी व्यक्त केली होती. एवढेच नाही, तर 'बात निकली है तो दूर तक जाएगी,' असे वक्तव्यही त्यांनी केले होते. आता ओवेसी यांना कोट करत AIMIM ने इतिहास आणि मुघल काळासंदर्भात ट्विट केले आहे.

या ट्विटमध्ये ओवेसी म्हणाले, भारतातील मुसलमानांचा मुघलांशी कसलाही संबंध नाही. पण हे सांगा, की मुघल बादशहांच्या बायका कोण होत्या? ओवेसी यांनी यापूर्वी, पुष्यमित्राने तोडलेल्या बौद्ध मंदिरांसंदर्भात भाजप का भाष्य करत नाही, असा सवालही उपस्थित केला होता.

'दुसरी मशीद कदापी गमावणार नाही' -तत्पूर्वी, ज्ञानवापी वादावर बोलताना असदुद्दीन ओवैसी म्हणाले होते, की मी सरकारला सांगू इच्छितो, की आम्ही एक बाबरी मशीद गमावली आहे. आता दुसरी मशीद कदापी गमावणार नाही. तुम्ही न्यायाची हत्या करून आमची मशीद हिसकावली आहे. दुसरी मशीद हिसकावू शकणार नाही, हे लक्षात ठेवा.

"असदुद्दीन ओवेसी जनतेची दिशाभूल करतायत" -ओवेसी यांनी कायद्याची पदवी घेतली असून, त्याचे ज्ञानही त्यांना आहे. ज्ञानवापी मशिदीचे सर्वेक्षण करणे हे प्रार्थनास्थळ कायद्याचे उल्लंघन आहे, असे सांगून ते लोकांची दिशाभूल करत आहेत. कायद्याचा त्याच्याशी काहीही संबंध नाही. मशीद किंवा मंदिर पाडायचे असेल तेव्हाच या कायद्याचा उल्लेख करता येईल. ते बेकायदेशीर नाही. याप्रकरणी न्यायालयाने निर्देश दिले आहेत, असे भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटले होते.

टॅग्स :Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनGyanvapi Mosqueज्ञानवापी मशीदhistoryइतिहास