शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

'मुस्लिमांचा वापर लग्नातल्या बँड बाजा पार्टीसारखा, समाजाला नेताच नाही'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2021 10:11 IST

कानपूर येथे आयोजित एका कार्यक्रमात बोलताना ओवेसी देशातील मुस्लीमांबद्दल खंत व्यक्त केली. देशातील मुस्लींमांची अवस्था लग्नातल्या बँड बाजा पार्टीसारखी झालीय, जिथं अगोदर त्यांना वाजंत्री वाजवायला सांगितली जाते.

ठळक मुद्देउत्तर प्रदेशात 19 टक्के मुस्लीम समाज आहे. येथे प्रत्येक समाजाकडे नेता आहे, पण मुस्लीम समजाकडे नेता नाही, असेही औवेसी यांनी म्हटले. 

लखनौ - उत्तर प्रदेशमध्ये पुढील वर्षात विधानसभेच्या निवडणुका होत आहे. त्याअनुषंगाने आता सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. एमआयएमनेही उत्तर प्रदेशाकडे आपला मोर्चा वळवला आहे. त्यासाठी, सध्या उत्तर प्रदेशात एमआयएमचे प्रमुख खासदार असुदुद्दीन औवेसी यांचे दौरे वाढले आहे. रविवारी एका कार्यक्रमात बोलताना थेट मुस्लीमांना उद्देश भाषण केले. देशातील मुस्लीमांची अवस्था ही लग्नातल्या बँड बाजा पार्टीसारखी झाल्याचं ते म्हणाले.  

कानपूर येथे आयोजित एका कार्यक्रमात बोलताना ओवेसी देशातील मुस्लीमांबद्दल खंत व्यक्त केली. देशातील मुस्लींमांची अवस्था लग्नातल्या बँड बाजा पार्टीसारखी झालीय, जिथं अगोदर त्यांना वाजंत्री वाजवायला सांगितली जाते. पण, नंतर बाहेरच उभा केलं जात. उत्तर प्रदेशात 19 टक्के मुस्लीम समाज आहे. येथे प्रत्येक समाजाकडे नेता आहे, पण मुस्लीम समजाकडे नेता नाही, असेही औवेसी यांनी म्हटले.  औवेसी यांनी अयोध्येतून विधानसभा निवडणुकांच्या प्रचार मोहिमेला सुरुवात केली आहे. पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीत ४०३ जागांपैकी १०० ठिकाणी उमेदवार उभा करणार असल्याची घोषणाही त्यांनी केलीय. उत्तर प्रदेशात ८२ असे मतदारसंघ आहेत, जिथे मुस्लीम मतदारांची संख्या जास्त असून उमेदवारांचं भवितव्य ठरवू शकतात.  

टॅग्स :AIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनMuslimमुस्लीमAsaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीElectionनिवडणूक