शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
4
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
5
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
6
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
7
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
8
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
9
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
10
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
11
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
12
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
13
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
14
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
15
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
16
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
17
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
18
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
19
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
20
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
Daily Top 2Weekly Top 5

"भारतात मुस्लिमांवर अत्याचार होतायत", इराणच्या सर्वोच्च नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य; परराष्ट्र मंत्रालयानं स्पष्टच सुनावलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2024 00:30 IST

"अल्पसंख्यांकांवर टिप्पणी करणाऱ्या देशांना सल्ला दिला जात आहे की, त्यांनी इतरांसंदर्भात कुठल्याही प्रकारचे भाष्य करण्यापूर्वी स्वतःचे रेकॉर्ड बघावे."

इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी सोमवारी (16 सप्टेंबर) भारतात मुस्लिमांवर अत्याचार होत असल्याच आरोप केला. त्यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त जगभरातील मुस्लिमांना संघटित होण्याचे आवाहन करत, एका संदेशात भारत, गाझा आणि म्यानमारमधील मुस्लिमांसंदर्भात भाष्य केले.

खामेनेई यांनी एक्सवरील आपल्या पोस्टमध्ये 'इस्लामचे शत्रू' अशा शब्दाचाही वापर केला आहे. आपल्या एक्स पोस्टमध्ये अयातुल्ला अली खामेनेई म्हणाले, "इस्लामच्या शत्रूंनी आपल्याला नेहमीच 'इस्लामी उम्माह'च्या आपल्या समान ओळखीबद्दल उदासीन करण्याचा प्रयत्न केला आहे. जर आपल्याला म्यानमार, गाजा, भारत अथवा इतर कुठल्याही ठिकाणी एका मुस्लिमाला होत असलेल्या त्रासाबद्दल माहिती नसेल, तर आपण स्वतःला मुसलमान मानू शकत नाही.''

इराणने स्वतःकडे बघावे - इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खमेनी यांच्या या कथित आरोपावर आता भारताचीही प्रतिक्रिया आली आहे. खमेनी यांच्या वक्तव्यानंतर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने या आरोपांला कठोर शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे आणि खामेनेई यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे.

परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे, "इराणच्या सर्वोच्च नेत्याने भारतातील अल्पसंख्यांकांसंदर्भात केलेल्या वक्तव्याचा आम्ही तीव्र निषेध करतो. हे चुकीच्या माहितीवर आधारित असून अस्वीकार्य आहे. अल्पसंख्यांकांवर टिप्पणी करणाऱ्या देशांना सल्ला दिला जात आहे की, त्यांनी इतरांसंदर्भात कुठल्याही प्रकारचे भाष्य करण्यापूर्वी स्वतःचे रेकॉर्ड बघावे." 

टॅग्स :IranइराणMuslimमुस्लीमIndiaभारतCentral Governmentकेंद्र सरकार