शहरं
Join us  
Trending Stories
1
हनिमूनसाठी नाही तर कायमचे संपवायला घेऊन गेली होती सोनम; पतीच्या हत्येप्रकरणी अखेर अटक
2
"भ्रष्टाचार संपवायचा असेल, तर 500 रुपयांची नोट बंद केली पाहिजे"; मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे विधान चर्चेत
3
मान्सून एक्स्प्रेसला ‘बॅड पॅच’; १३ जूनपासून पुन्हा धो-धो..., शेतकरी सक्रिय मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत
4
"मंदिरापासून ते स्मशानभूमीपर्यंत सगळ्यांना समान अधिकार हवा"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे विधान
5
"या प्रकरणानंतर मला काम मिळणं बंद होईल.."; 'पारु' मालिकेतील अभिनेत्याच्या व्हिडीओची चर्चा, काय म्हणाला?
6
"PM मोदी युद्ध थांबवण्यात यशस्वी, जर ते लांबले असतं तर नुकसान झालं असतं"; चंद्राबाबू नायडूंनी केलं कौतुक
7
आजचे राशीभविष्य : ०९ जून २०२५; आजचा दिवस व्यावसायिकांसाठी लाभदायी, नोकरीत बढती संभवते
8
...तर गुप्ता, सुपेकरांची चौकशी होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
अमेरिकेतील हॉलीवूडचे शहर पेटले; पोलिसांवर फेकले दगड अन् फटाके, अवैध प्रवाशांविरुद्धच्या मोहिमेला प्रचंड विरोध
10
मोबाइल, लॅपटॉपमधून येणाऱ्या प्रकाशामुळेही तुम्हाला होऊ शकतो कॅन्सर; डॉक्टर म्हणतात, मोबाइल पाहणे थांबवाच
11
लाचखोर उपजिल्हाधिकारी, डीवायएसपी, तहसीलदार यांना अभय कोणाचे?; ३६६ प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत
12
पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांमध्ये ५० टक्के कौशल्याधारित शिक्षण, युजीसीकडून लवकरच मार्गदर्शक सूचना; विद्यार्थ्यांच्या रोजगार क्षमतेत होणार वाढ
13
यूपीपाठोपाठ दिल्लीत एन्काउंटरमध्ये वाढ, जूनच्या पहिल्या पाच दिवसांत पाच एन्काउंटर
14
नेपाळच्या ७ हजार लोकांना अमेरिका सोडावी लागणार, अमेरिकेने विशेष देशाचा दर्जा काढून घेतला
15
अंध वकिलाकडून सुप्रीम कोर्टात प्रथमच युक्तिवाद, भारतीय न्यायव्यवस्थेत ऐतिहासिक क्षण
16
जळक्या नोटा : न्या. वर्मांपुढे आता राजीनाम्याचाच पर्याय
17
मणिपूर पेटले, निदर्शकांनी अंगावर घेतले पेट्रोल ओतून
18
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
19
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
20
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  

मुस्लीम तरुणांत ‘रमजान अ‍ॅप्स’ची चलती

By admin | Updated: June 22, 2016 02:44 IST

मुस्लिमांच्या पवित्र रमजान महिन्यात हायटेक युवा पिढीसाठी नवे अ‍ॅप्स वरदान ठरत आहेत. गुगल प्लेवर अक्षरश: याबाबत माहितीचा खजिनाच खुला झाला आहे.

लखनौ : मुस्लिमांच्या पवित्र रमजान महिन्यात हायटेक युवा पिढीसाठी नवे अ‍ॅप्स वरदान ठरत आहेत. गुगल प्लेवर अक्षरश: याबाबत माहितीचा खजिनाच खुला झाला आहे. धर्मगुरू आणि मुस्लीम विद्वानांचे असे मत आहे की, रमजानच्या माहितीसाठी हे चांगले माध्यम आहे. अर्थात, यातील माहिती ही इस्लामच्या नियमानुसारच असावी. या अ‍ॅप्लिकेशनच्या माध्यमातून रोजे ठेवण्याचे महत्त्व, नमाजाबाबत माहिती, अतिशय सुंदर लिपीतील कुराण शरीफ आणि त्याचा अनुवाद, नमाजचे रिमाइंडर, विविध परिस्थितीत केल्या जाणाऱ्या दुआ यासह इस्लाममधील महत्त्वाची माहिती यात आहे. तरुण पिढीत याची सध्या मोठी क्रेझ असल्याचे दिसून येत आहे. प्रमुख इस्लामी शोध संस्था दारुल मुसन्निफीन शिबली अ‍ॅकॅडमीचे संचालक प्रोफेसर इश्तियाक अहमद जिल्ली म्हणाले की, जर महत्त्वाची माहिती यातून मिळत असेल, तर चांगली बाब आहे. अर्थात, ते असेही म्हणाले की, इंटरनेटवरच्या हायवेवर एवढी गर्दी आहे की, काय बरोबर आहे आणि काय चूक आहे याची माहिती घेणे अवघड काम आहे. अशा वेळी याचा उपयोग करणाऱ्यांनी अतिशय सावध राहण्याची आवश्यकता आहे. धार्मिक अप्लिकेशनच्या प्रामाणिकपणाच्या तपासासाठी एक स्वतंत्र यंत्रणा हवी. (वृत्तसंस्था)