शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

तामिळनाडूत सीएएविरोधात मुस्लिमांची निदर्शने

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2020 06:05 IST

बुधवारी मोर्चा काढू नये असा आदेश मद्रास उच्च न्यायालयाने मुस्लिम

चेन्नई : नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या (सीएए) निषेधार्थ तामिळनाडूमध्ये चेन्नईसह अनेक ठिकाणी हजारो मुस्लिमांनी बुधवारी रस्त्यावर उतरून जोरदार निदर्शने केली. तामिळनाडूतील मुस्लिम संस्थांतर्फे हे आंदोलन करण्यात आले. या निदर्शनांमध्ये द्रमुक व अन्य राजकीय पक्षांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. चेन्नईतील चेपॉक येथे मुस्लिमांची निदर्शने सुरू असताना, त्याचवेळी तामिळनाडूचे मुख्यमंत्री के. पलानीस्वामी यांनी मुस्लिमांसाठी कल्याणकारी योजनांची विधानसभेत घोषणा केली. त्यानुसार उलेमांच्या पेन्शनमध्येही वाढ करण्यात आली आहे. पूर्वी असलेले १५०० रुपये पेन्शन आता तीन हजार रुपये करण्यात आले आहे. तसेच नवीन हाज इमारत बांधण्यासाठी तामिळनाडू सरकार १५ कोटी रुपयांचा निधी देणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

बुधवारी मोर्चा काढू नये असा आदेश मद्रास उच्च न्यायालयाने मुस्लिम संघटनांना दिला होता. तामिळनाडूतील मदुराई, तंजावूर, कुड्डलोर, कोईम्बतूर, तिरूपूर, तिरूनेवेल आदी ठिकाणीही मुस्लिम बांधवांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात निदर्शने केली. हजारो मुस्लिम निदर्शक चेपॉक येथे जमा झाले होते. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याचा निषेध करणारे फलक मोर्चेकऱ्यांनी हाती धरले होते. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात तामिळनाडू विधानसभेने ठराव मंजूर करावा अशीही त्यांची मागणी होती. या मोर्चात मुस्लिम महिलाही मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. तामिळनाडू विधानसभा, राज्य सचिवालय परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यामुळे मुस्लिम आंदोलकांनी अखेर चेपॉक येथेच निदर्शने केली. कर्नाटकात कवी व पत्रकाराला अटकच्कर्नाटकमधील कोप्पल जिल्ह्यात गेल्या महिन्यात झालेल्या कार्यक्रमामध्ये नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधातील कविता गायल्याबद्दल एक पत्रकार व कवी अशा दोन जणांना अटक करण्यात आली आहे. ही माहिती पोलिसांनी बुधवारी दिली. सिराज बिसारल्ली या कवीने गंगावती शहरामध्ये जानेवारी महिन्यात झालेल्या अनेगुंडी उत्सवात ही कविता म्हटली होती व त्याची ध्वनिचित्रफित राजाबक्षी या पत्रकाराने समाजमाध्यमांवर झळकवली होती. 

टॅग्स :Tamilnaduतामिळनाडूcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकMuslimमुस्लीम