शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पावरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

देवबंदमध्ये २५ राज्यातून मुस्लीम संघटना एकटवल्या; पोलिसांचा चोख बंदोबस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2022 11:33 IST

या संमेलनात देशातील सध्याच्या परिस्थितीवर, ज्ञानवापी मस्जिदसह विविध धार्मिक स्थळावरील वादग्रस्त मुद्दे, समान नागरी कायदा, मुस्लीम वक्फ, मुस्लीम शिक्षणावर चर्चा होणार आहे

सहारनपूर - उत्तर प्रदेशच्या सहारनपूर इथं मुस्लीम संघटना जमियत उलमा ए हिंदचं मोठे संमेलन आयोजित करण्यात आले आहे. याठिकाणी जमियतचा झेंडा फडकवून कार्यक्रमाची सुरुवात झाली. या संमेलनात देशातील २५ राज्यातील जवळपास २ हजाराहून अधिक मुस्लीम संघटना एकत्र आल्या आहेत. २८ आणि २९ मे रोजी हे संमेलन चालेल. देवबंदच्या ईदगाह मैदानात सगळ्या मुस्लीम संघटना एकवटल्या आहेत. 

या संमेलनात प्रामुख्याने ज्ञानवापी-शृगांर गौरी वाद, कुतुबमीनार आणि श्रीकृष्ण जन्मभूमीसारख्या धार्मिक मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. जमियतचं संमेलन माजी खासदार मौलाना महमूद मदनी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडत आहे. जमियत उलमा ए हिंदच्या कार्यक्रमात २५ राज्यातील लोक सहभागी होणार आहेत. त्यात मुख्य महाराष्ट्रातून मौलाना नदीम सिद्दीकी, यूपीहून मौलाना मोहम्मद मदनी, तेलंगानागहून हाजी हसन, मणिपूर मौलाना मोहमद सईद, केरळ जकरिया, तामिळनाडूहून मौलाना मसूद, बिहारहून मुफ्ती जावेद, गुजरातहून निसार अहमद, राजस्थानहून मौलाना अब्दुल वाहिद खत्री, आसामहून हाजी बसीर, त्रिपुराहून अब्दुल मोमीन पोहचले आहेत. त्याचसोबत खासदार मौलाना बदरुद्दीन अजमल, पश्चिम बंगालचे मंत्री मौलाना सिद्दीकी उल्लाह चौधरी, शूरा सदस्य मौलाना रहमतुल्लाह कश्मीर यांच्यासह अनेक बडे नेते उपस्थित राहणार आहेत. उत्तराखंड, झारखंड, पश्चिम बंगालहून बहुतांश मुस्लीम संघटना यात सहभागी झाल्या आहेत. 

या संमेलनात देशातील सध्याच्या परिस्थितीवर, ज्ञानवापी मस्जिदसह विविध धार्मिक स्थळावरील वादग्रस्त मुद्दे, समान नागरी कायदा, मुस्लीम वक्फ, मुस्लीम शिक्षणावर चर्चा होणार आहे. जमियत उलमा ए हिंदचे जिल्हा महासचिव जहीद अहमद यांनी सांगितले की, मौलाना महमूद मदनी यांच्या अध्यक्षतेखाली होणारे संमेलन तीन टप्प्यात होईल. वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा विनिमय होईल त्यानंतर अंतिम टप्प्यात विविध ठराव पास केले जातील असं त्यांनी सांगितले. 

जमियत उलेमा-ए-हिंदच्या परिषदेत देशाच्या विविध राज्यांतून जमियतशी संबंधित लोकांना बसण्यासाठी योग्य व्यवस्था करण्यात आली आहे. सुमारे पाच एकर जागेत संपूर्ण कव्हर एसी मंडप तयार करण्यात आला आहे. ज्यामध्ये अडीच टनाचे २० हून अधिक एसी बसवण्यात आले आहेत. हॉटेल व्यतिरिक्त ईदगाह मैदानात बांधण्यात आलेल्या मंडपात पाहुण्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

अतिरिक्त बल आणि LIU सतर्क पोलीस प्रशासनानेही परिषदेची पूर्ण तयारी केली आहे. देशभरातून येणारे शिष्टमंडळ आणि उलामा यांच्या सुरक्षेसाठी विशेष व्यवस्था करण्यात येणार आहे. इतर जिल्ह्यातून अतिरिक्त फौजफाटा मागवण्यात आला आहे. तर मंडप आणि आसपासचे एलआययू देखील सतर्क राहतील. एसएसपी आकाश तोमर यांनी सांगितले की, पोलीस प्रशासनाने परिषदेची सर्व तयारी केली आहे. संमेलनस्थळी एक कंपनी पीएसी, तीन पोलिस निरीक्षक, दहा उपनिरीक्षक, सहा महिला हवालदार आणि ४० कॉन्स्टेबल तैनात असतील.

टॅग्स :Muslimमुस्लीमGyanvapi Mosqueज्ञानवापी मशीद